राज्यपालांनी स्टेजवरच काढला महिलेच्या तोंडावरचा मास्क

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर कोरोना प्रोटोकॉल पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना देखील मास्क घालणं देखील गरजेचं आहे. पण याच प्राथमिक गोष्टीचा विसर खुद्द राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

कारण एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी सत्कार करतेवेळी चक्क एका महिलेच्या तोंडावरचा मास्कच खाली घेतल्याचं समोर आलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जास्तीत जास्त कोरोना नियमाचं पालन करण्याचं आवाहन सातत्याने करत आहेत. पण दुसरीकडे राज्यपालांच्या या वागण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा यादरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

मात्र त्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकलपटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्याच हाताने काढला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

‘कोरोना म्हणजे थोतांड’, मास्कविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाचा Covid-19 मुळेच मृत्यू

ADVERTISEMENT

तर दुसर्‍या बाजूला केंद्र आणि राज्य सरकारने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याचं निदर्शनास आलं. यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी राज्यपालांसारख्या जबाबदार व्यक्तीने अशाप्रकारचं कृत्य केल्याने आता याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

महाराष्ट्रात 16 सप्टेंबर रोजी 3595 नवे रूग्ण आढळले होते. तर 3240 रूग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर 45 मृत्यूंची नोंद झाली होती. महाराष्ट्राचा मृत्यू दर सध्या 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 20 हजार 310 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतकं झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 65 लाख 29 हजार 882 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 11 हजार 525 नमुने आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 89 हजार 425 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 342 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3595 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 11 हजार 525 इतकी झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT