आक्रोश अन् अश्रुंचा पूर! डोळ्यासमोर गमावली चार लेकरं; पावसाने कुटुंब केलं उद्ध्वस्त
गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात हलोल येथे मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. औद्योगिक परिसरात गुरुवारी (29 जून) झालेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या तंबूंवर कारखान्याची भिंत कोसळली. अनेक जण त्यात गाडले गेले.
ADVERTISEMENT
Gujrat News : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात हलोल येथे मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. औद्योगिक परिसरात गुरुवारी (29 जून) झालेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या तंबूंवर कारखान्याची भिंत कोसळली. अनेक जण त्यात गाडले गेले. या घटनेत पाच वर्षांखालील चार मुलांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Gujrat Rain caused the wall to collapse and 4 children lost their lives instantly)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहे. वास्तविक हे लोक हालोल तालुक्यातील चंद्रपुरा गावात असलेल्या एका रासायनिक कारखान्याजवळील बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतात. याठिकाणचे जिल्हा पोलीस अधीक्षक हिमांशू सोळंकी यांनी सांगितले की, कामगारांची कुटुंबे कारखान्याच्या भिंतीजवळ बांधलेल्या तात्पुरत्या तंबूत राहत होती. मुसळधार पावसामुळे अचानक भिंत कामगार कुटुंबांवर पडली. भिंत कोसळल्याने एकूण १० जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी पाच वर्षांखालील चार मुलांचा मृत्यू झाला.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुहूर्त
चारही मृत मुलं 5 वर्षांखालील वयोगटातील…
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काही जखमींना हलोल केएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर काहींना, वडोदरा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.पाच वर्षांचा चिरीराम डामोर, चार वर्षांचा अभिषेक भुरिया, दोन वर्षांचा गुनगुन भुरिया आणि पाच वर्षांची मुस्कान भुरिया अशी मृत मुलांची नावे आहेत.
हे वाचलं का?
चार मृत मुलांपैकी तीन सख्खे भाऊ होते. जीआयडीसीची जी भिंत पडली ती अत्यंत कमकुवत होती. सततच्या पावसामुळे भिंतीचे वजन वाढल्याचे समजते. यानंतर पाण्याच्या प्रवाहात भिंत कोसळली. त्यामुळे या कुटुंबांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही.
शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
मुसळधार पावसाचा जोर आणखी पाच दिवस कायम!
गुजरातमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या किनारी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अहमदाबादसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून नोटिसा दिल्या जात आहेत, जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये.
ADVERTISEMENT
ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून मोफत प्रवास, शिंदे सरकारची जाहिरात चर्चेत का?
गुजरातमधील 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान खात्याने 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये राजकोट, अमरेली, भावनगर, गीर सोमनाथ, दाहोद, सूरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलसाड यांचा समावेश आहे. त्याचवेळी सौराष्ट्रातील भावनगर आणि अमरेली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये सध्या हलका पाऊस सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT