Omicron चा धोका : बाहेरील देशातून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावर ‘अशी’ होतेय तपासणी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यासह देशभरात सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटची दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १० रुग्ण सापडले आहेत. यासाठीच सरकारने मुंबई विमानतळावरुन बाहेरील देशातून येणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्यासाठी प्रशासनाने अद्ययावत यंत्रणा उभारली आहे.

ADVERTISEMENT

कालच्या दिवसात मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विमानं आली. अति धोक्याच्या देशांमधून म्हणजेच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, झिम्बाब्वे, ब्राझील, चीन, मॉरिशीअस, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्राईल मधून येणाऱ्या नागरिकांना इतरांपासून वेगळं केलं जात आहे. याव्यतिरीक्त अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांना कोणतीही टेस्ट न करता एअरपोर्टबाहेर पडण्याची मूभा आहे.

Omicron : परदेशातून २९५ नागरिक कल्याण-डोंबिवलीत, KDMC १०९ जणांच्या शोधात

हे वाचलं का?

निगेटीव्ह रिपोर्ट आल्याशिवाय एअरपोर्टबाहेर प्रवेश नाही –

RTPCR चाचणीसाठी ऑनलाईन नोंद केलेल्या लोकांसाठी इमिग्रेशन काऊंटरबाहेर एक वेगळा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रवाशांचं तापमान तपासण्यासाठी या जागेवर थर्मल स्कॅनिंग मशिन्स बसवण्यात आली आहेत. या थर्मल स्कॅनिंग मशिन्समुळे गर्दी होण्याचे प्रकार टाळले जात आहेत. याव्यतिरीक्त ज्या व्यक्तींनी RTPCR टेस्टसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एअरपोर्ट प्रशासनातर्फे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी प्रत्येक महत्वाच्या काऊंटवर ५ ते ६ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवड : धाकधुक वाढली, परदेशातून आलेल्या १० प्रवाशांना कोरोनाची लागण

ADVERTISEMENT

प्रवाशांची थर्मल टेस्टिंग झाल्यानंतर पुढे कोविड चाचणीचा टप्पा येतो. सध्याच्या घडीला कोविड चाचणी करण्याचं कंत्राट काही कंपन्यांना देण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला विमानतळावर चार कंपन्यांमार्फत कोवीड चाचणी केली जात असून सर्वांसाठीचं शुल्क एकसारखंच आहे. प्रवाशांना चाचणीसाठी फार काळ ताटकळत वाट पहावी लागणार नाही याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे. प्रवाशांनी आपली माहिती दिल्यानंतर त्यांची तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे.

रॅपीड अँटिजेन की RTPCR ?

बाहेरील देशांतून येणारे बहुतांश नागरिक हे विमानतळावर रॅपीड अँटीजेन चाचणीचा प्राधान्य देत आहेत. या चाचणीचा निकाल एका तासात प्रवाशांना मिळतो आहे. परंतू यासाठी प्रवाशांना ३९०० रुपये मोजावे लागत आहेत. जोपर्यंत प्रवासी इमिग्रेशन, कस्टम अशा सर्व प्रक्रीया पूर्ण करतात तोपर्यंत त्यांच्या हातात त्यांना रिपोर्ट मिळतो आणि तो निगेटीव्ह असेल तर ते बाहेर पडू शकतात. पण काही प्रवाशांना जर पैसे वाचवायचे असतील आणि त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांच्यासाठी RTPCR चाचण्यांची सोय करुन दिली आहे. या चाचणीचा निकाल सहा तासांनी येतो, तोपर्यंत प्रवाशांना Meet and Greet भागात थांबता येऊ शकतं. इथे प्रवाशांना चार्गिंगसाठीची सोय आणि खाण्या-पिण्याची दुकानं दिमतीला आहेत. जिथे तुमच्या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही थांबू शकता.

तुमच्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला तर?

जर एखाद्या प्रवाशाचा अहवाल पॉजिटीव्ह आला तर त्याला तात्काळ इतर प्रवाशांपासून वेगळं करुन क्वारंटाईन केलं जातं. पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या प्रवाशाचे नमुने जिनोम टेस्टिंगसाठी पाठवण्यात येतात. सध्याच्या घडीला ५ वर्षाखालील मुलांना या कोविड चाचण्यांमधून वगळण्यात आलं आहे. परंतू एखाद्या लहान मुलाला जर कोरोनाची लक्षण दिसत असतील तर त्याला कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT