शाळेत हिजाब बंदी योग्य की अयोग्य? सुप्रीम कोर्टात फैसला; जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुंबई तक

कर्नाटकच्या हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. शाळेत हिजाब बंदी योग्य की अयोग्य याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया खंडपीठ निकाल सुनावणार आहे. 10 दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी 22 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. शाळेत हिजाब बंदी योग्य की अयोग्य यावर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कर्नाटकच्या हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. शाळेत हिजाब बंदी योग्य की अयोग्य याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया खंडपीठ निकाल सुनावणार आहे. 10 दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी 22 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. शाळेत हिजाब बंदी योग्य की अयोग्य यावर दोन्ही बाजूंनी आपापले युक्तिवाद मांडले आहेत. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता 16 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. अशा स्थितीत या आधी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती.आता ते आज येणे अपेक्षित आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

हे संपूर्ण प्रकरण हिजाबशी संबंधित आहे. वास्तविक, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता. त्यांनी कर्नाटक सरकारचा आदेश कायम ठेवला. मुस्लिम मुलींना शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालण्याचा अधिकार हवा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

कर्नाटक सरकारने 5 फेब्रुवारी 2022 रोजी दिला होता आदेश

हे वाचलं का?

    follow whatsapp