ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग
मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. […]
ADVERTISEMENT
मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. परंतू पदावरुन हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
अनिल देशमुख यांना एका कार्यक्रमात बोलत असताना अँटिलीया बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांचा तपास करत असताना मुंबई पोलिसांकडून आणि आयुक्तांकडून काही चुका झाल्या आणि या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या. म्हणूनच परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याचं सांगितलं होतं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
“मार्च महिन्याच्या मध्यावधीत मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला अँटिलीया बाहेरील तपासाची माहिती देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी मी या तपासात माननीय गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिली. याबद्दल मी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही माहिती दिली. काही मंत्र्यांना माझ्या ब्रिफींगमधले मुद्दे आधीच माहिती असल्याचं माझ्या लक्षात आलं.” या पत्रात पुढे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडून १०० कोटींची मागणी केल्याचाही उल्लेख केला आहे.
हे वाचलं का?
क्राईम ब्रांचच्या CIU युनिटचे प्रमुख सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय बंगल्यावर अनेकदा बोलावलं होतं. वाझे आणि देशमुख यांच्यात अनेकदा मिटींग झाल्या असून यात देशमुखांनी वाझेंना फंड गोळा करण्याविषयी सांगितलं. वाझे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीदरम्यान देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी पालंडेही हजर असायचे. या बैठकीत देशमुख यांनी वाझे यांच्याकडून प्रत्येक महिन्यात १०० कोटींची मागणी केली. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत १ हजार ७५० बार, रेस्टॉरंट व अन्य दुकानं आहेत. प्रत्येक ठिकाणातून २ ते ३ लाख गोळा केले तरीही महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज जमवता येऊ शकतात. याव्यतिरीक्त अन्य रक्कम ही इतर मार्गाने मिळवता येईल असंही देशमुखांनी सांगितल्याचं परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला याची माहिती दिली. हे ऐकून मलाही धक्का बसला, परिस्थितीचा कसा सामना करायचा याचाच मी विचार करत होतो. यानंतर काही दिवसांनी सोशल सर्विस ब्रांचमधील ACP पदावर कार्यरत असणाऱ्या संजय पाटील यांना गृहमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर बोलावून मुंबईतील हुक्का पार्लरबद्दल चर्चा केली. दोन दिवसांनी संजय पाटील आणि DCP भुजबळ यांना पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर बोलावून घेतलं. परंतू यावेळी दोघांमध्ये भेट झाली नाही आणि श्री. पालंडे यांनी पाटील व भुजबळ यांना गृहमंत्री गृहमंत्री ४० ते ५० कोटींचा फंड जमवण्याची अपेक्षा करत असल्याचं सांगितलं. पाटील आणि भुजबळ यांनाही पालंडे यांनी रेस्टॉरंट आणि इतर दुकानांवर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं.
ADVERTISEMENT
“गृहमंत्री प्रत्येकवेळी माझ्या अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलावून पैसे गोळा करण्याविषयी सांगायचे. गृहमंत्र्यांची ही चुकीची कामं माझ्या अधिकाऱ्यांनी मला लक्षात आणून दिली होती.” परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार का या चर्चांना उधाण आलं होतं. परमबीर सिंगांच्या पत्रानंतर राज्यातील विरोधक सत्ताधारी पक्षाला आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT