Raj Thackeray: राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत गृहमंत्री वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमधील जाहीर सभा होणार की नाही याबाबत सध्या बराच संभ्रम आहे. मात्र आता यविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, लवकरच औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांच्या जाहीर सभेबाबत निर्णय घेतील. पाहा दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले: ‘मनसेच्या सभेच्या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात निर्णय घेतील. ते […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमधील जाहीर सभा होणार की नाही याबाबत सध्या बराच संभ्रम आहे. मात्र आता यविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, लवकरच औरंगाबाद पोलीस आयुक्त त्यांच्या जाहीर सभेबाबत निर्णय घेतील.
पाहा दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले:
‘मनसेच्या सभेच्या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून औरंगाबाद आयुक्त योग्य तो निर्णय घेतील.’
‘काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात बऱ्याच विषयावर चर्चा झाली आहे. आता जर त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर याविषयी काय करायचं ते औरंगाबादचे पोलीस आयुक्त करतील. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही. जर कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार नक्कीच कारवाई करेल.’ असंही वळसे-पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
1 मे रोजी राज ठाकरेंची सभा घेण्यावर मनसे ठाम
औरंगाबादमधील जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे यांची सभा घेणारच असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.
औरंगाबादमध्ये कोणत्याही परिस्थितीत 1 मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद पोलीस नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरेंना औरंगाबाद सभेपूर्वीच झटका; पोलिसांच्या आदेशामुळे सभेवरही प्रश्नचिन्ह
औरंगाबादमध्ये 9 मे पर्यंत जमावबंदी आदेश स्थानीक प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही याबद्दल मनसैनिकात संभ्रम होता. पण दिलीप धोत्रे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणारच असं ठामपणे सांगितलं आहे.
मनसे नेत्याने सभेची घोषणा केल्यामुळे आता येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देण्याचं मोठं आव्हान औरंगाबाद पोलीस आणि राज्य सरकारसमोर असणार आहे. अशावेळी ठाकरे सरकार काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हा जमावबंदी आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 25 एप्रिल 2022 पासून ते 9 मे 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू
औरंगाबाद येथे 1 मे रोजी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादमधील सभेची मनसेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. मात्र, सभेची घोषणा झाल्यानंतर औरंगाबादेतील विविध पक्ष-संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
राज ठाकरेंना औरंगाबाद सभेपूर्वीच झटका; पोलिसांच्या आदेशामुळे सभेवरही प्रश्नचिन्ह
संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निर्दशने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे.