MLC Election : कोकणात भाजपच्या विजयाची ३ कारणं, वाचा सविस्तर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)

पण ज्ञानेश्वर म्हात्रे कसे ठरले जाएंट किलर? या विजयाचे खरे शिल्पकार कोण?

  • या विजयाचं पहिलं श्रेय जातं ते ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या संघटनात्मक कामाला :

म्हात्रे यांनी या मतदारसंघात गेले ६ वर्ष जोरदार मोर्चेबांधणी केली. शिक्षकांची मोठी फौज त्यांनी उभी केली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतदारसंघातील तब्बल ३३ संघटनांचा पाठिंबा म्हात्रेंनी मिळवला. याच जोरावर म्हात्रेंचा दमदार विजय झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

MLC Election : भाजपच्या विजयात CM शिंदेंचा बालेकिल्ला ठरला गेम चेंजर

  • म्हात्रेंच्या विजयाचं दुसरं कारण ठरलं भाजप- शिंदे सेनेची ताकद :

ADVERTISEMENT

कोकण मतदारसंघाचे सगळ्यात जास्त मतदार ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आहेत. हा भाग शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही उदय सामंत, दिपक केसरकरांनी मोठी ताकद म्हात्रेंच्या पाठिमागे उभी केली. याचा मोठा फायदा म्हात्रेंना झाला. तसेच, भाजपनं या मतदारसंघाची जबाबदारी रविंद्र चव्हाणांवर सोपवली होती. पनवेल, उरण पट्ट्यात भाजपच्या प्रशांत ठाकूरांची मोठी साथ म्हात्रेंना मिळाली. एकूणच भजपची मोर्चेबांधणी यशस्वी ठरली.

ADVERTISEMENT

MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे

  • अँटी इन्कम्बन्सी रोखण्यात बाळाराम पाटलांना अपयश :

दुसरीकडे शेकापच्या बाळारम पाटील यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. बाळाराम पाटलांनी शिक्षकांसाठी गेल्या ६ वर्षांत काहीच केलं नाही असा आरोप ज्ञानेश्वर म्हात्रेंनी प्रचारादरम्यान केला होता. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची मते पाटलांना मिळतात का यावर शेकापचे अस्तित्व ठरणार होतं.

यात महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. अँटीइंकबसीचा फटका बाळाराम पाटलांना बसला. जुनी पेन्शन योजनेसारखा मोठा मुद्दा भाजपच्या विरोधात असला तरी भाजपनं कोकणात विजय खेचून आणला. खरंतर शिक्षक मतदारसंघाची समीकरणं वेगळी असतात. या निवडणुकीत पक्षापेक्षाही उमेदवाराचं संघटनात्मक काम कायमच निर्णायक ठरतं हे या विजयानं पुन्हा अधोरेखित केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT