Vaccination for Children: कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांसाठी लस… जाणून घ्या याविषयी
मुंबई: देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पण परिस्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. कारण तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा (Corona Third Wave) अंदाज व्यक्त केला आहे. तसंच ही लाट मुलांसाठी (Children) अधिक धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगभरात मुलांच्या लसीबाबत […]
ADVERTISEMENT

मुंबई: देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पण परिस्थिती अद्यापही सामान्य झालेली नाही. कारण तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा (Corona Third Wave) अंदाज व्यक्त केला आहे. तसंच ही लाट मुलांसाठी (Children) अधिक धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगभरात मुलांच्या लसीबाबत (Vaccine For Children) काम वेगाने सुरु आहे.
आता, प्रौढांव्यतिरिक्त, देशातील 18 वर्षाखालील 15 कोटी मुलांना लस देण्याचे सरकारसमोर आव्हान आहे. तेही अशा वेळी जेव्हा देशातील कोणतीही लस अद्याप मुलांसाठी पूर्णपणे तयार नाही. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु भारतात अद्याप मुलांसाठी लस क्लिनिकल ट्रायल स्टेजवर आहे.
मुलांच्या लसीकरणाच्या तयारीसंदर्भात नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणतात, ‘देशात मुलांच्या कोरोना लसीबाबत ट्रायल सुरू आहे. भारतात मुलांची संख्या खूप मोठी आहे. अशावेळी देशात मुलांसाठी 25 कोटी लस डोस लागणार आहेत. कारण आपण कुणालाही लसीपासून वंचित ठेऊ शकत नाही. जर धोका कमी करायचा असेल तर सर्व मुलांना लस द्यावी लागेल.
‘Corona ची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नाही’
