Ticket Booking : आता Whatsapp वरून बुक करता येणार बस तिकीट, समजून घ्या कसं?
रेडबसकडून आणखी एक सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बस तिकीट बुक करता येणार आहे.
ADVERTISEMENT
How to Book Ticket on Whatsapp : असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या मोबाईलमध्ये WhatsApp नसेल. लोकप्रिय असलेल्या या मेसेजिंग अॅपचे भारतासह जगभरात लाखो युजर्स आहेत. सातत्याने नवीन फीचर्स आणत असते. आता या मेसेजिंग अॅपच्या मदतीने युजर्स घरबसल्या बसचे तिकीट बुक करू शकणार आहेत. ऑनलाइन बस तिकीट बुकिंग सेवा देणाऱ्या रेडबसने चॅटबॉटची घोषणा केली आहे. (Now you can book bus tickets through WhatsApp)
ADVERTISEMENT
व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेणे आणि त्याच्या प्रवाशांना चांगला देण्याच्या उद्देशाने रेडबसने ही सेवा सुरू केलीये. या चॅटबॉटच्या मदतीने त्यांना जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचायचे आहे. यासोबतच त्यांनी बुकिंग प्रक्रियेतही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा >> Jalgaon : CM शिंदेंविरोधात बातमी छापली, पत्रकारावर जीवघेणा हल्ला; पहा Video
RedBus म्हटलंय की, हा चॅटबॉट फक्त तिकीट बुकिंगपुरता मर्यादित नाही. हे यूजर्संना तात्काळ मदतही करेल. तसेच, भविष्यातील प्रवासासाठी काही प्लान्सही सजेस्ट करेल.
हे वाचलं का?
चॅटबॉट्स म्हणजे काय?
ChatBots दोन शब्दांनी बनलेला आहे. तुम्हाला चॅट म्हणजे काय हे माहिती आहे. बॉट म्हणजे इंटरनेट-आधारित प्रोग्राम जो वापरकर्त्यांशी संवाद साधतो. या दोन्ही गोष्टींना मिळून कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे बनवलेली सिस्टीम, जी तुमच्याशी संवाद करते.
व्हॉट्सअॅपद्वारे बस तिकीट बुक कसे करायचे?
व्हॉट्सअॅपद्वारे बस तिकीट बुक करणे खूप सोपे आहे. यात यूजर्संना रेडबसच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉट नंबरवर संदेश पाठवावा लागेल. ही प्रक्रिया कशी आहे, ते समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
वाचा >> Raj surve : ‘तुम्हारा बाप बोल रहा हूँ’, आमदार सुर्वेंच्या कार्यालयात CEO सोबत काय घडलं?
– सगळ्यात आधी 8904250777 हा क्रमांक सेव्ह करा.
– त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून रेड बसचे नाव शोधा.
– त्यानंतर WhatsApp चॅटबॉटवर हाय पाठवा.
– WhatsApp चॅटबॉट तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडण्यास सांगेल.
– यानंतर ‘बुक बस तिकीट’ हा पर्याय निवडा.
– प्रोसेस झाल्यानंतर लोकेशन व्हेरिफाय करून घ्या. त्यानंतर continue वर क्लिक करा.
– यूजर्संना एसी, नॉन एसी आणि वेळ इत्यादी माहिती द्यावी लागेल.
– यानंतर तुमच्या माहितीच्या आधारे उपलब्ध बसेसची माहिती तुम्हाला दाखवली जाईल.
– ज्या व्यक्तीला प्रवास करायचा आहे, त्याची माहिती भरल्यानंतर ड्रॉपिंग पॉइंट म्हणजे कुठे उतरायचं आहे, हे निवडा.
– आता यूजर्संला पेमेंट पर्याय निवडून पैसे भरावे लागेल.
– यानंतर बुक झालेल्या तिकिटाचा तपशील यूजरला केवळ व्हॉट्सअॅपवर येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT