सोलापूर: वृध्द पत्नीचा खून करून पती फरार; सुनेने दिली सासऱ्याविरोधात तक्रार
विजयकुमार बाबर, सोलापूर: घरात झालेल्या किरकोळ वादानंतर वृद्ध पतीने वृद्ध पत्नीच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घालून आणि लाकडी बांबूने मारहाण करत हत्या केल्याची घटना सोलापुरात समोर आली आहे. वृद्ध पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केली. लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण केल्याने वृद्ध महिला यात गंभीररित्या जखमी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 13 जानेवारी […]
ADVERTISEMENT
विजयकुमार बाबर, सोलापूर: घरात झालेल्या किरकोळ वादानंतर वृद्ध पतीने वृद्ध पत्नीच्या डोक्यात लोखंडी खुर्ची घालून आणि लाकडी बांबूने मारहाण करत हत्या केल्याची घटना सोलापुरात समोर आली आहे.
ADVERTISEMENT
वृद्ध पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केली. लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण केल्याने वृद्ध महिला यात गंभीररित्या जखमी झाली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 13 जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात घडली आहे.
यावेळी जखमी वृद्ध महिलेस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना वृध्द महिलेचा मृत्यू झाला. लतीफा मेनोद्दीन शेख (वय 55 वर्ष, रा. कळमन, ता उत्तर सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे.
हे वाचलं का?
जुन्नर: चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या
लतीफा व त्यांचा पती मैनोद्दीन यांच्यात किरकोळ कारणावरून घरात वाद झाला होता. यावेळी भांडणात पती मैनोद्दुदीन याने पत्नी लतिफा हिला ढकलत घराबाहेर आणून तिच्या डोक्यात थेट लोखंडी खुर्ची घातली आणि तिला खाली पाडलं व नंतर डोक्यावर बांबूने मारहाण केली. यात पत्नी लतिफा ही गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
याप्रकरणी लतीफा यांची सून जास्मीन समीर शेख हिने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत महिलेच्या पती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही आरोपी मैनोद्दीन शेख हा पोलिसांना सापडलेला नाही. पत्नीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला आहे. त्यामुळे सध्या सोलापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT