Pune MNS: ‘…म्हणून मी मनसे कार्यालयात जात नाही’, वसंत मोरेंच्या या वक्तव्याचा अर्थ काय?
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हापासून मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली आहे तेव्हापासून मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे काहीसे नाराज आहेत. दोन दिवसांपासून मनसेचं जे भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु झालं आहे तिथूनही वसंत मोरे गायब असल्याचं पाहायला मिळालं. आपण बालाजीला गेलो होतो म्हणून पुण्यात नव्हतो असं आज (6 मे) वसंत मोरे यांनी […]
ADVERTISEMENT

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हापासून मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली आहे तेव्हापासून मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे काहीसे नाराज आहेत. दोन दिवसांपासून मनसेचं जे भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु झालं आहे तिथूनही वसंत मोरे गायब असल्याचं पाहायला मिळालं.
आपण बालाजीला गेलो होतो म्हणून पुण्यात नव्हतो असं आज (6 मे) वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितलं. पण यावेळी बोलताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
‘..म्हणून मी मनसेच्या कार्यालयात जात नाही’
पक्षात तुमच्याविरोधात कुरघोडी सुरु आहेत का? असा सवाल जेव्हा वसंत मोरे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘पक्षांतर्गत कुरघोडी या त्याच वेळेस चालू असतात ज्यावेळी पक्ष मोठा होत असतो आणि मला वाटतं आमच्यात थोडेफार मतभेद झाले आहेत. मतभेद आहेत मनभेद झालेले नाही.’