Chhagan Bhujbal: माझं मत मांडण्याचा मला अधिकार, छगन भुजबळ आपल्या वक्तव्यावर ठाम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या भाषणामध्ये देवी-देवतांविषयी एक वक्तव्य केले होते. त्यावर वाद निर्माण झाला होता. परंतु आता छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

छगन भुजबळ पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले?

”माझ्या वक्तव्याचं राजकीयकरण का केला जातं हे मला कळत नाहीये. माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मी काय देशाच्या विरोधात बोललो नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले देव आहेत, या महापुरुषांनी शिक्षणासाठी खूप काम केले आहे या लोकांनी आपल्याला शिक्षक दिले आहे. सरस्वतीचे आपण पूजन करतो तिने काय आपल्याला शिकवले नाही त्यांनी कुठे शाळा काढली नाही,” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले ”सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे मी सरस्वती ऐवजी यांचं पूजा करा असं मी म्हणालो. मी कुठेही सरस्वती देवीची फोटो काढा असे म्हणलो नाही.”

समता परिषदेच्या भाषणात काय म्हणाले होते छगन भुजबळ?

समता परिषदेच्या आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले होते ”फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो शाळेमध्ये लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?, फुले, शाहू, आंबेडकर तुमचे देव असले पाहिजे असंही भुजबळ म्हणाले होते. यावरती एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले होते. ”कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

छगन भुजबळांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ”जर असं कुणी म्हटलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. सरस्वती विद्येची देवता आहे. सरस्वती कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत हा सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व मान्य नसेल असाच व्यक्ती असं बोलू शकतो. महापुरुषांचे फोटो लावा, पण त्यासाठी सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय?”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT