हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: साधारण वर्षभर विधानसभेचं अध्यक्षपद हे रिक्त आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या अधिवेशनात अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही निवड आवाजी मतदानाने होणार असल्याने त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याचबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तुफान टीका केली आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भित्रं सरकार आहे. अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

पाहा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधानसभेत नेमकं काय घडलं

  • महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं इनसिक्युअर सरकार कधीही पाहिलेलं नाही: फडणवीस

हे वाचलं का?

‘ज्या सरकारजवळ 170 चं बहुमत आहे असं सांगितलं जातं. 60 वर्षांहून अधिक काळ झालाय महाराष्ट्र निर्मितीला आणि अचानक एवढी भीती का सरकारी पक्षाच्या मनामध्ये? की, जे सिक्रेट बॅलेटने अध्यक्षाची निवड व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय करतोय. सत्ता पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही?’

‘सत्ता पक्षाजवळ बहुमत नाही की, ओपनली सगळे जण सपोर्ट करतात. पण प्रत्यक्षात मनात प्रचंड खदखद असल्यामुळे सीक्रेट बॅलेटमध्ये आपला अध्यक्ष ते पाडतील अशा प्रकारची कदाचित भीती या ठिकाणी दिसते आहे. पण त्याही पेक्षा एकीकडे नियमांमध्ये बदल करतात आणि एवढी घाई कशासाठी? दहा दिवसाचा कालावधी असताना आपण तो कालावधी एका दिवसावर आणला.’

ADVERTISEMENT

’57 चा वापर या प्रस्तावाकरता करता येणार नाही. 57 च्या अंतर्गत नियम स्थगित करु शकतो. पण नियमाच्या रचनेत बदल करु शकत नाही. यामध्ये आपण नियमाच्या रचनेत बदल करतो आहोत.’

ADVERTISEMENT

‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं इनसिक्युअर सरकार पाहिलेलं नाही. आता हे सांगतील वरच्या सभागृहात असं आहे.. तसं आहे.. तिथे 60 वर्ष असंच होतं. पण इथे 60 वर्षानंतर अचानक नियम बदलायची वेळ का आली? अशा प्रकारे आपल्या आमदारांवर अविश्वास दाखविण्याची वेळ का आली?’

‘एवढं इनसिक्युअर सरकार कधीही बघितलेलं नाही. म्हणून हा जो प्रस्ताव मांडलेला आहे. याला माझी हरकत आहे.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • घोडेबाजार म्हटलं तर यांना एवढा त्रास काय झाला?: नाना पटोले

देवेंद्र फडणवीस यांनी आपली हरकत नोंदवल्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी त्यांना उत्तर देताना म्हटलं की, ‘नियम दुरुस्तीची भूमिका मांडली कारण घोडेबाजार बंद व्हावा असा या मागचा उद्देश आहे. घोडेबाजार म्हटलं तर यांना एवढा त्रास काय झाला? नियम आपण काय पहिल्यांदा बदलत आहोत का? आपल्याला जेव्हा-जेव्हा वाटलं हे नियम चुकीचे आहेत नियम आपण बदलेले आहेत.’ असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

  • अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात एकमतसुद्धा करता येतं: मुनगंटीवार

नाना पटोले यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडल्यानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलं की, ‘अध्यक्ष महोदय, आपण एक अतिशय सज्जन अध्यक्ष आहात. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण आमच्यापेक्षा उंच खुर्चीवर बसला आहात तर उंच विचाराने या निर्णयाकडे पाहावं. खरं तर साधा सरळ सोपा मार्ग होता की, अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात एकमतसुद्धा करता येतं. सरकारने कोणताही दुजाभाव किंवा आम्ही मोठे आहोत ही भावना न ठेवता विरोधी पक्ष नेत्यांसोबत येऊन सुद्धा आपल्याला एक मताने अध्यक्ष निवडता आला असता.’

‘कदाचित तेव्हा नियम करणाऱ्या समितीच्या सदस्यांना असं वाटलं असेल की, असंही सरकार कधी तरी जन्माला येऊ शकतं की, ज्या सरकारमध्ये मतदाराशी बेईमानी करुन ते आलं तर अध्यक्षाकडून न्याय मिळावा म्हणून गुप्त पद्धतीने अध्यक्षाची निवडणूक केली.’

‘अध्यक्ष महोदय मी तुमच्या घराच्या भिंतीवर जे वाक्य लिहलं हे तेच वाचून दाखवतो. यश हे अंतिम नसते. ‘अपयश हे घातक नसते.. या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं.’ तर या सरकारकडे धैर्य नाहीए का?’ असा सवाल करत मुनगंटीवार यांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली.

Assembly Winter Session : उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल -चंद्रकांत पाटील

यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरुन यापुढेही सरकार आणि विरोधक यांच्यात खंडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आपले विधानसभा अध्यक्ष कसे निवडून आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT