MNS-BJP Alliance: ‘मनसे-भाजपची युती होणार असेल तर आनंदच आहे’, बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य
मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ही भेटीत जवळजवळ तासभराहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. याच भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनसे आणि […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील (Mumbai) ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ही भेटीत जवळजवळ तासभराहून अधिक वेळ चर्चा सुरु होती. याच भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मनसे आणि भाजप हे भविष्यात एकत्र येणार असतील तर आनंदच आहे.’ असं नांदगावकर म्हणाले. त्यामुळे आजच्या भेटीत मनसे-भाजप युतीवर (MNS-BJP Alliance) नक्कीच चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘लपूनछपून काय करायचं? जर काही करायचं म्हटलं तर ते उघडच होणार आहे. अद्याप तरी आम्ही आमच्या पक्षाचं आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत. पण जर दोन पक्ष एकत्र येण्याचा भविष्यात प्रयत्न करत असतील तर आनंदचीच गोष्ट आहे.’ असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी युतीचे एक प्रकारे संकेतच दिले आहेत.
पाहा बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले: