उद्या तुमच्या बायकोला अटक झाली तर? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा नवनीत राणांच्या निशाण्यावर
मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटक होऊन जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका महिलेविरोधात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यावेळी पुढे बोलत असताना नवतीन राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
ADVERTISEMENT

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटक होऊन जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका महिलेविरोधात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
यावेळी पुढे बोलत असताना नवतीन राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वादात ओढलं. “एकदा तुमची सत्ता गेली आणि तुमच्या घरातील कोणाला तरी…समजा तुमच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना तुरुंगात टाकलं तेव्हा मी विचारेन की जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी तुरुंगात टाकल्यावर तुम्हाला कसं वाटतं?”
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मी हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात. एखाद्या भक्ताच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठन केल्यामुळे कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होत नाही. एखाद्या दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळाबाहेर जर हे झालं असतं तर आपण असं म्हणू शकतो. मी कुठेच सामाजिक तेढ निर्माण केली नसल्याचं राणा म्हणाल्या.
हनुमान चालीसा वादानंतर आपल्यावर झालेली कारवाई ही फक्त त्रास देण्यासाठी झाली होती असंही राणा मुलाखतीत म्हणाल्या. “मी स्वतंत्र भारतात राहणारी एक स्त्री आहे. हनुमान चालीसेचं पठन केल्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं याचा मी विचारही करु शकत नाही. त्या दिवशी संपूर्ण रात्र ते पहाटे पाच वाजेपर्यंत मी तुरुंगात उभी होते. त्यांनी मला पाणी किंवा साधी चटईही दिली नाही.” त्यांच्यात जराशीही माणुसकी शिल्लक राहिलेली नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट असल्याचं राणांनी सांगितलं.