रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

मुंबई तक

योगगुरू रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. रामदेवबाबांनी कोरोना लसीबाबत केलेलं वक्तव्य हे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. एवढंच नाही तर त्यांनी डॉक्टरांबाबतही रामदेवबाबांनी चुकीची वक्तव्यं केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता IMA ने केली आहे. रामदेवबाबा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगगुरू रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता IMA ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. रामदेवबाबांनी कोरोना लसीबाबत केलेलं वक्तव्य हे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. एवढंच नाही तर त्यांनी डॉक्टरांबाबतही रामदेवबाबांनी चुकीची वक्तव्यं केली आहेत त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता IMA ने केली आहे.

रामदेवबाबा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडताना दिसते आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांना कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर आता रामदेवबाबांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी IMA ने केली आहे, Whats App मेसेजवरून जो वाद सुरू झाला होता तो वाद आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी रामदेवबाबांनी अॅलोपॅथीची खिल्ली उडवली होती. ते वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

Allopathy चा अभ्यास केला आहे का? विचारत मुंबईच्या डॉ. लेलेंनी केली बाबा रामदेव यांची बोलती बंद

बाबा रामदेव यांनी काय वक्तव्य केलं होतं?

हे वाचलं का?

    follow whatsapp