Monsoon Update : आज पुन्हा जोरदार पावसाचा IMD चा इशारा, मुंबईसह नजिकच्या परिसरात पावसाच्या सरी
भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. याचसोबत रायगड-रत्नागिरी या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढचे ३ दिवस ही परिस्थिती कायम […]
ADVERTISEMENT
भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. याचसोबत रायगड-रत्नागिरी या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढचे ३ दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस पडू शकतो.
21/7, 12.50 night
Jalna, Beed, Nanded, Latur, Parbhani Hingoli, Satara, Palghar, Thane, Mumbai, Pune, Ratnagiri, Sindhudurg
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in above districts during 3 hours.
Nowcast already issued by IMD
-IMD MUMBAI pic.twitter.com/VV0t03gqTt— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 20, 2021
गेल्या २४ तासांपासून कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही काल बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याचसोबत मुंबई आणि ठाणे परिसरातलही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
२१/७, १२.३० night,
गेल्या 3 तासात फ़क्त काही ठिकाणी हलका पाउस दिसतोय. सगळं कसं शांत शांत…
उद्या दिवसा बहुतेक चित्र बदलेल असण्याची शक्यता.
IMD चे इशारे कृपया पहा pic.twitter.com/1xiWCVK9X7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 20, 2021
दरम्यान IMD ने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे तलाव भरले असून मुंबईकरांवरची पाणीटंचाईची टांगती तलवार सध्या दूर झाली आहे.
ADVERTISEMENT