सरकार पडण्याच्या वल्गना होत असताना, ठाकरे सरकारने आजच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय!
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वेळापुर्वी भाषण करुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी गायब आमदारांना आणि राज्यातील जनतेला भावनीक साद घातली आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त माझ्या समोर येऊन सांगा असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला आव्हान दिले आहे. एकीकडे सरकार पडण्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वेळापुर्वी भाषण करुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यात मुख्यमंत्र्यांनी गायब आमदारांना आणि राज्यातील जनतेला भावनीक साद घातली आहे. मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त माझ्या समोर येऊन सांगा असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला आव्हान दिले आहे. एकीकडे सरकार पडण्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गृहखातं, अर्थखातं, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले. pic.twitter.com/29hFsEGJ7N
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 22, 2022
मुख्यमंत्री बैठकीत ४ मुख्य निर्णय घेण्यात आले आहेत.
1) करमाळा, कळंब येथे न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2) अर्थखात्यामध्ये अर्थ व सांख्यिकीमध्ये अपर संचालक पद निर्माण करण्याची मान्यता मंत्रीमंडळ बैठकीत झालेला आहे.










