संभाजीनगर नामांतर : जे सोबत आले नाहीत, त्यांची वाट लागणार – इम्तियाज जलील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद – शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून एम आय एम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा लक्ष केलं. नामांतराला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यावर जे आले नाहीत त्यांना पण लक्षात ठेवू. शहराच्या अस्तित्वाच्या मुद्द्यावर सोबत नाही आले, त्यांची तर वाट लागणार आहे. कोणत्या एका पक्षाचे नाव घेत नाही. काँग्रेस म्हणतात आमच्या अजेंड्यावर विषय नव्हता. बाळासाहेब थोरातम्हणतात आम्ही विरोध नाही केला. चव्हाण साहेब नांदेडला येतोय. तुमचा बँड वाजवायला येतोय. अशी टीका जलील यांनी केली.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस टीका करताना जलील काय म्हणाले?

नामांतराला विरोध करण्यासाठी आम्ही एक सुरुवात केली. आम्ही संभाजी महाराजांचा अवमान करत नाहीये. जो इतिहास चारशेवर्षांपूर्वी काय झालं माहीत नाही. मात्र आज बेरोजगारांना रोजगार हवा आहे. युवक नोकरी मागत आहे तर तुम्ही शहराच नाव बदलूनदेत आहे. शहराला पाणी नाही. उद्धव ठाकरे माझेपण मुख्यमंत्री होते. त्यांनी आधी शहराचा विकास करू आणि नंतर नामांतर करू अस म्हणले होते. मात्र अचानक काही दिवसात कोणती जादूची कांडी फिरवली. हे माहीत नाही. जे लोक बापाला बाप म्हणायलातयार नाही ते आम्हाला उद्धार करायला निघाले आहेत. अशी टीका खा जलील यांनी केली.

राजकारण करण्यासाठी आम्ही महापुरुषांची नाव घेत नाही. आधी शहराला आंतरराष्ट्रिय दर्जाचे करा. आम्ही स्वतः प्रस्ताव घेऊनतुमच्याकडे येऊ. दोन दिवस एक नेते आले. आधी म्हणाले संमतीने झालं आता म्हणतात आम्हाला माहीत नव्हत. शरद पवारजी झुटबोले कव्वा काटे. आम्ही आता तुम्ही म्हणाल तर करणार नाही, तुम्ही बस म्हणले बसले आणि उठ म्हणले उठले अस होणार नाही. असा इशारा खा जलील यांनी दिला.

हे वाचलं का?

संभाजीनगर बाबत जो निर्णय घ्यायचा होता तर 2014 मधे सत्ता आली त्यावेळी का घेतला नाही, देश बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंविधानाने चालेल. आम्ही मंत्री आहे आणि औरंगाबादच्या लोकांना मान्य करावा लागेल असे वाटत असेल तर उद्धव बाबा आमच्यानादी लागू नका. ठरवायचं असेल तर औरंगाबादची जनता ठरवेल. सर्व जातीचे लोक या मुद्द्यावर जोडले गेले आहेत. राजनीती सुरूआहे. आमच्यावर निर्णय लादले जात आहेत. आमच्यावर जबरदस्ती केली जात आहे. असा आरोप खा इम्तियाज जलील यांनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT