मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंच्या ३५ मिनिटांच्या भेटीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यात आज वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेषत प्राप्त झाले. आज दोघांमध्ये ३५ मिनटं चर्चा झाली. या चर्चेत राज्यसभेच्या सहाव्या जागे संदर्भात चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रत्सावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी असा प्रस्ताव संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याचं कळतय. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवतो असे सांगितलंय.

काय आहेत बैठकीत झालेल्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे?

हे वाचलं का?

१) छत्रपती संभाजीराजे शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तरी संभाजीराजे राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांसोबतच असतील.

२) राज्यसभेत शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णायावर संभाजीराजे समर्थन करतील. राज्यसभेतील विधेयकं आणि इतर राजकिय निर्णयांना संभाजीराजे यांचा पाठिंबा राहील.

ADVERTISEMENT

३) अगामी सर्व निवडणुकांमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचा प्रचार करणार. विशेषतः मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत.

ADVERTISEMENT

४) शिवसेनेच्या सहकार्याने आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे असले तरी संभाजीराजे शिवसेनेचे २३ वे खासदार म्हणूनच कार्यरत राहतील.

५) छत्रपती संभाजी राजे यांनी ‘ स्वराज्य ‘ संघटनेची घोषणा करून सर्वपक्षीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. संभाजीराजे यांच्या या निर्णयामुळेच शिवसेनेला हा प्रस्ताव द्यावा लागला आहे. त्यात आता संभाजीराजे यांनी काही सुधारणाही सुचवल्या आहेत.

६) संभीजीराजे यांच्या सुधारीत प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्यावरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार म्हणून शिवसेना त्यांचा निर्णय जाहीर करेल.

या दोन नेत्यांमध्ये सुमारे ३५ ते ४० मिनिटं चर्चा झाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT