कान्समध्ये दीपिकासोबत घडलं असं काही, दीपिकाला रेड कार्पेटवर पाहताच एक व्यक्ती करू लागला किस..अवघडली दीपिका …

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि बॉलीवूडचे नाते चांगलेच जुने आहे. सर्वात प्रथम अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा पसरवला. त्यानंतर प्रत्येक कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये ऐश्वर्याची हजेरी अनिवार्यच झाली.

ADVERTISEMENT

मात्र आता अलीकडच्या काळात अनेक बॉलीवूड कलाकारांना कान्समध्ये आमंत्रित करण्यात येत आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, कंगना राणावत, सारख्या अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अदांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चांगलीच चर्चा रंगवली आहे. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली आहे.

तमन्ना भाटिया, हेली शाह, हिना खान, यांनी तर कान्समध्ये आपला जलवा परवलाच आहे. मात्र ऐश्वर्याच्या खास लुकने पुन्हा एकदा चांगलीच चर्चा रंगवली. पण या सर्वांना माघे टाकत सगळीकडेच दीपिकाची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे.

हे वाचलं का?

दीपिका इतकी सुंदर आहे की ज्याचीही तिच्यावर नजर असते तो काही वेळ फक्त अभिनेत्रीकडे पाहत राहतो किंवा अभिनेत्रीला स्पर्श करून तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. या अभिनेत्रीचा या वर्षी ज्युरी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि दररोज दीपिकाचे अनेक आकर्षक लूक पाहायला मिळत आहेत जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.अशा परिस्थितीत कान्सच्या रेड कार्पेटवरून दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिका लुइस वुटतोंचा रेड गाउन सोबत गळ्यात कार्टीयरचा डायमंड नेकलास मध्ये दीपिका खूप सुंदर दिसली. हॉलिवूड स्टारची नजर दीपिकावर पडताच ही व्यक्ती दीपिकाला भेटल्याशिवाय राहू शकली नाही.

या व्यक्तीने दीपिकाला पाहताच तिला मिठीतच घेतले. हे सर्व सहाजिकच दीपिका साठी अनपेक्षित होते. या प्रसिद्ध हॉलीवूड कलाकाराने दीपिकाला पाहताच आपल्यावरचा सं’यम सो’डला आणि जाऊन तिला हग केल. अशा परिस्थितीत, दीपिकाने ही परिस्थिती अत्यंत हुशारीने हाताळल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.दीपिका सुरुवातीला थोडी अ’स्वस्थ दिसली आणि ती या व्यक्तीचा हात तिच्या कंबरेवरून काढताना दिसली, पण दीपिकाने त्याला ओळखताच तिने त्याला मि’ठी मा’रली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.दीपिकाच्या बुद्धीचातुर्याचे चांगलेच कौतुक होत आहे. दरम्यान सोनम कपूर यंदा ग’रोद’र असल्या कारणामुळे कान्समध्ये गेली नाही. कंगना राणावत देखील लवकरच कान्समध्ये जाणार आहे. त्यामुळे तिच्याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT