Mumbai Corona Cases: चिंताजनक… मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाची (Corona) दुसरी लाट सुरु झाल्यानंतर मुंबईत (Mumbai) अगदी झपाट्याने रुग्ण सापडू लागले होते. त्यामुळे रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन (Lockdown) देखील लागू केला. त्यामुळे मुंबईच्या रुग्णसंख्येत बरीच घट झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहेत. (corona patients rise) जी प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरु शकते.

ADVERTISEMENT

आज (16 जून) दिवसभरात मुंबईत जवळजवळ 830 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजचा आकडा हा वाढलेला दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे.

काल (14 जून) मुंबईत 575 रुग्ण सापडले होते. मात्र आज रुग्णांच्या संख्येत जवळजवळ तीनशेने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. मुंबईत आज घडीला 14,907 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, आज दिवसभरात 1300 हून अधिक रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आतापर्यंत 6,86,125 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आज मुंबईत एका दिवसात 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 15,227 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Vaccination Scam आरोप प्रकरणी मुंबई महापालिकेने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ADVERTISEMENT

अद्याप मुंबई Level-3 मध्येच

ADVERTISEMENT

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून आल्यानंतर राज्य सरकारने लेव्हलनुसार जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार सध्या मुंबई लेव्हल-2 मध्ये आहे. मात्र तरीही महापालिका प्रशासनाने मुंबईमध्ये लेव्हल-3 चे निर्बंध लावलेले आहेत.

सध्या मुंबई महानगरपालिका हद्दीत कोव्हिड-19 पॉझिटिव्हिटी रेट हा 4.40 टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर हा 27.12 टक्के एवढा आहे. यानुसार सध्या मुंबई दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे. मात्र, तरीही काही गोष्टी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लेव्हल-3 चे नियम कायम ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे.

मुंबईला लेव्हल-3 मध्येच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने का घेतला?

1. मुंबई शहराची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण

2. मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करुन मोठ्या संख्येने मुंबई शहरात दररोज येणारे प्रवासी

3. भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर परिसरात येत्या काही दिवासत दिलेला अतिवृष्टीचा इशारा

Mumbai Unlock: मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांहून कमी तरीही मुंबईकरांवर Level-3 चे निर्बंध

तिसऱ्या लेव्हलमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांसाठी नेमके कोणकोणते निर्बंध?

संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.

याव्यतिरीक्त मॉल्स-थिएटर्स सर्व बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 2 पर्यंत खुली राहतील आणि त्यानंतर पार्सल सेवा देता येणार आहे. मॉर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मुभा, 50 टक्के क्षमतेनं खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT