नाशिकमध्ये पतीच्या हत्येसाठी पत्नीने दिली सुपारी, सळईने चेहरा ठेचत मृतदेह फेकला दरीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पत्नीने पतीची हत्या एक लाख रूपयांची सुपारी देऊन त्याच्या हत्येचा कट रचला. एवढंच नाही प्रियकराच्या साथीने तिने पतीला हाल हाल करून मारलं आणि मग त्याचा मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. पती-पत्नीचं नातं हे प्रेम, विश्वासावर आधारीत असलेलं नातं असतं. मात्र या नात्याला काळीमा फासणारी ही घटना नाशिकमध्ये घडली आहे.

या प्रकरणी मृताची पत्नी शोभा सचिन दुसाने, दत्तात्रय महाजन, संदीप किट्टू स्वामी, अशोक काळे, गोरख जगताप, पिंटू उर्फ बाळासाहेब मोगरे, मुकरम जाहीर अहमद शहा या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नाशिक : ‘वेळ लागेल म्हणाली अन् मोबाईल स्विच ऑफ झाला’; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूने शहर हादरलं

सचिन शामराव दुसाने हा मुळचा निफाडचा असून त्याचा मृतदेह पेठ या ठिकाणी आढळला. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा प्रतिबंधक पथकाने गुन्हेगारांचा छडा लावून त्यांना अटक केली आहे. एक लाखाची रक्कम, मोबाईल आणि कार हे जप्तही करण्यात आलं आहे. आरोपींनी सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र योग्य मार्गदर्शन आणि डिटेक्शनच्या जोरावर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणातील महिला आरोपीसह इतर सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांना सगळ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

नाशिक : महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य; तिघांना पोलिसांनी केलं अटक

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह पोलिसांना आढळला. हा मृतदेह गुजरातमधला आहे की नाशिकमधला याचा तपास आधी सुरू करण्यात आला होता. मृतदेहाच्या अंगावर कपडे, बूट आणि राम हे नाव गोंदलेलं होतं. याशिवाय कोणतीही खूण नव्हती. प्राथमिक तपासात या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याला फेकण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि त्यानुसार तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील, सआयक पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, संजय गोसावी, हनुमंत महाले प्रभाकर पवार, अंमलदार नितीन मंडलिक आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

कसा लागला छडा?

पोलिसांनी सर्वात आधी संशयित दत्तात्रय याला ताब्यात घेतलं. आधी त्याने उत्तरं द्यायला टाळाटाळ केली. मात्र त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. दत्तात्रयचे शोभा दुसानेसोबत प्रेमसंबंध होते. 22 जानेवारीला शोभाचा पती सचिन याला बेदम मारहाण करून आणि त्याचे हाल करून ठार करण्यात आलं. ही कबुली दत्तात्रयने दिली. सगळ्यात आधी सचिनचा गळा आवळण्यात आला. त्यानंतर लोखंडी सळईने त्याच्यावर वार करण्यात आले. सचिनचा चेहरा इतका विद्रुप करण्यात आला होता की त्याची ओळख पटू शकली नव्हती.

दत्तात्रय महाजनने यासाठी सराईत गुन्हेगारांना एक लाख रूपयांची सुपारी दिली होती. अत्यंत छळ आणि हाल करून सचिनला ठार करण्यात आल्यानंतर सचिनचा मृतदेह त्याच्या डस्टर कारच्या डिकीमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर पेठजवळच्या कोळंबी घाटात ही कार आणण्यात आली. या ठिकाणी दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सचिनचा मृतदेह झाडाला लटकला आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर हा धक्कादायक आणि भयंकर प्रकार समोर आला.

सचिनला संपवल्यानंतर त्याच्या डस्टर कारचेही तुकडे करण्यात आले होते. पुरावे मिटवण्याचा प्रयत्न पूर्णपणे झाला. मात्र पोलीस या सगळ्यापर्यंत पोहचले आणि त्यांनी या हत्येचा छडा लावला. सचिनला ठार करण्यासाठी त्याच्या पत्नीनेच एक लाखांची सुपारी दिली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT