NCP: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान राडा
मोहम्मद हुसेन खान, पालघर पालघरमध्ये (Palghar) जिल्हाधिकाऱ्यांच्या (District collector) कार्यालयातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) दोन गटात तुफान राडा झाल्याचं आता समोर आलं आहे. पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची निवडणूक आल्याने 14 जुलै रोजी जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सहा सदस्य व काँग्रेसच्या एक सदस्यांचा पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसले […]
ADVERTISEMENT
मोहम्मद हुसेन खान, पालघर
ADVERTISEMENT
पालघरमध्ये (Palghar) जिल्हाधिकाऱ्यांच्या (District collector) कार्यालयातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) दोन गटात तुफान राडा झाल्याचं आता समोर आलं आहे. पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची निवडणूक आल्याने 14 जुलै रोजी जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सहा सदस्य व काँग्रेसच्या एक सदस्यांचा पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते.
मात्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा या गटाचा याला विरोध असल्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनात निलेश सांबरे गट व सुनील भुसारा गटात जोरदार शाब्दिक वादावादी झाली. जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दलनाबाहेर खेचून काढण्याचाही यावेळी प्रयत्न झाला व धक्काबुक्कीही केली.
हे वाचलं का?
राष्ट्रवादीचा जो गट स्थापन करण्यासाठी आला त्याला सुनील भुसारा यांनी विरोध दर्शवला व जिल्हाधिकारी यांच्या दालनातच तुफान राडा घातला. या वेळेला पालघरमधील राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित सुहास संख्ये यांच्याशी देखील सुनील भुसारा यांची शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं आहे.
या प्रकारामुळे गट स्थापन करायला आलेल्या सदस्यांना धोका असल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा मागविली आहे. आणि सर्व सदस्यांना पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणे घेऊन गेले.
ADVERTISEMENT
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांनी अशी माहिती दिली की, ’20 तारखेला येऊ घातलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी गट स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सात सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळ घेऊन आले होतो.’
ADVERTISEMENT
‘जिल्हाधिकारी साहेब यांनी सकाळपासून आम्हाला ताटकळत ठेवलं. यावेळी त्यांनी बाहेर बसवून ठेवलं होतं. कलेक्टर यांनी आम्हाला भेट दिली नाही म्हणून सात सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादीचेच आमदार सुनील भुसारा, माजी सभापती काशीनाथ चौधरी व इतरांनी कलेक्टरांच्या केबिनमध्ये घुसून सदस्यांना धक्काबुक्की करण्याचा व शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला.’
‘पक्षाचाच गट स्थापन करत आहोत आणि सर्व पक्षाचे सदस्य एकत्र असल्यामुळे गट स्थापन करीत आहोत. आम्हाला त्यांच्यापासून धोका असल्यामुळे आम्ही एसपी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांची संपर्क करून आम्हाला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केलेली आहे.’ असं संदेश ढोणे म्हणाले.
शिवसेना भवनासमोर Shivsena आणि BJP कार्यकर्त्यांचा राडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा गट स्थापन करण्यासाठी आलेल्या सदस्य मंदा घरट यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनातून येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असे घरट त्यांनी सांगितले आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT