Pimpri-Chinchwad: छोट्याशा संशयातून भर रस्त्यात युवकाची हत्या, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
समीर शेख, पिंपरी-चिंचवड पुणेलगतच्या (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील चिखली साने कॉलनी येथे भर दिवसा धारदार शस्त्राच्या सहाय्याने एका युवकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर चिखली पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी एका अल्पवयीन आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण हत्येचा थरार हा नजीकच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाल्याने […]
ADVERTISEMENT

समीर शेख, पिंपरी-चिंचवड
पुणेलगतच्या (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील चिखली साने कॉलनी येथे भर दिवसा धारदार शस्त्राच्या सहाय्याने एका युवकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर चिखली पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी एका अल्पवयीन आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण हत्येचा थरार हा नजीकच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाल्याने पोलिसांनी त्याच आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या विषयी चिखली पोलिसांनी अशी माहिती देण्यात आली आहे की, मयत इसमाचे नाव कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आकाश उर्फ मकसूद विजय जाधव या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.
आता पोलिसांनी या हत्येप्रकरणी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली आहे. एका साध्या संशयातून हे प्रकरण घडलं असल्याचं आता समोर आलं आहे. मृतक कानिफनाथ आणि हल्लेखोर आकाश हे पूर्वी एकमेकांच्या शेजारीच राहत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री देखील होती.










