म्यानमारमधल्या सत्तांतराने भारताचं टेन्शन वाढलं!
म्यानमारमध्ये सैन्य दलानं बंडाचं निशाण फडकवत देशात १ वर्षासाठी आणीबाणी लागू केलीय. तसंच आंग सान सू की यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अटक केलीय. निवडणुकीतल्या कथित अफरातफरी प्रकरणामुळे आपण आणीबाणी लावल्याचं सैन्य दलाचं म्हणणं आहे. पण शेजारी देशातल्या या सत्तांतरानं भारताचं टेन्शन वाढवलंय. चिल्ड्रन ऑफ गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंग सांग सू की यांच्याशी भारताचे चांगले […]
ADVERTISEMENT
म्यानमारमध्ये सैन्य दलानं बंडाचं निशाण फडकवत देशात १ वर्षासाठी आणीबाणी लागू केलीय. तसंच आंग सान सू की यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अटक केलीय. निवडणुकीतल्या कथित अफरातफरी प्रकरणामुळे आपण आणीबाणी लावल्याचं सैन्य दलाचं म्हणणं आहे. पण शेजारी देशातल्या या सत्तांतरानं भारताचं टेन्शन वाढवलंय.
ADVERTISEMENT
चिल्ड्रन ऑफ गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंग सांग सू की यांच्याशी भारताचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारतानं म्यानमारमधल्या या सत्तांतराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.
भारतानं आपल्या निवेदनात म्हटलंय, ‘आम्ही म्यानमारमधल्या घटनाक्रमाची दखल घेतलीय. भारत नेहमीच म्यानमारमधल्या लोकशाही पद्धतीनं होणाऱ्या सत्ता हस्तांतराच्या बाजूने राहिलाय. त्यामुळेच कायद्याचं राज्य आणि लोकशाही प्रक्रिया अबाधित राहिल्या पाहिजेत. सगळ्या घटनाक्रमावर आमची बारकाईनं नजर आहे.’
हे वाचलं का?
गेल्या काही काळापासूनच म्यानमारमध्ये सरकार आणि सैन्य दल यांच्यातले संबंध ताणले गेलेत. तेव्हापासून सत्तांतराची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवरच गेल्या नोव्हेबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने मोठा विजय मिळवला.
ADVERTISEMENT
याउलट सैन्य दलाला खूप कमी जागा मिळाल्या. त्यामुळे सैन्य दलाला आता आपला सरकारमधला प्रभाव संपेल, अशी भीती वाटत होती. या पार्श्वभूमीवरच सोमवारी सैन्य दलानं निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत आणीबाणी लागू केलीय.
ADVERTISEMENT
पण हे बंड म्यानमारमध्ये झालं असलं तरी त्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. भारत आणि म्यानमार हे सख्ये शेजारी आहेत. ईशान्य भारताला लागून दोन्ही देशांत सोळाशे किलोमीटर लांबीची बॉर्डर आहे. तसंच दोन्ही देशांत सागरी सीमाही येते. भारताकडून म्यानमारच्या सैन्य दलाला स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांसोबत संरक्षण साहित्याचाही पुरवठा केला जातो. या सगळ्यांवर म्यानमारमधल्या लष्करी बंडाचा परिणाम होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT