India Today Conclave 2023 : वाढत्या वयाला कसं थांबवायचं? ‘हा’ आहे फॉर्म्यूला

मुंबई तक

India Today Conclave 2023 : नवी दिल्ली : वाढतं वय आणि येणार वृद्धत्व हा आजच्या काळातील मोठ्या चिंतेचा विषय झाला आहे. पण आता या वाढत्या वयावर आणि वृद्धापकाळावर मात करून सदैव तरुण कसं राहायचं याबाबत मोठं रहस्य हार्वर्ड मेडिसिन स्कूलचे प्रोफेसर डेव्हिड सिंक्लेअर (Dr David Sinclair) यांनी सांगितलं आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये रिव्हर्स एजिंग […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India Today Conclave 2023 :

नवी दिल्ली : वाढतं वय आणि येणार वृद्धत्व हा आजच्या काळातील मोठ्या चिंतेचा विषय झाला आहे. पण आता या वाढत्या वयावर आणि वृद्धापकाळावर मात करून सदैव तरुण कसं राहायचं याबाबत मोठं रहस्य हार्वर्ड मेडिसिन स्कूलचे प्रोफेसर डेव्हिड सिंक्लेअर (Dr David Sinclair) यांनी सांगितलं आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये रिव्हर्स एजिंग या विषयावर बोलत होते. (The Harvard Medical School professor was discussing ‘Bio Switches and Age Clocks)

वय बदलाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, डॉ. सिंक्लेअर म्हणाले, विज्ञान अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथं आपल्याला वय रिव्हर्सल म्हणजे काय हे समजून घेता येतं. तंत्रज्ञान आता झपाट्याने प्रगती करत आहे. वास्तविक जीन्स आपलं वय ठरवत असतात आणि आपल्यापैकी बहुतेक जण परिपूर्ण जनुकांसह जन्माला येत नाहीत. आपल्या शरीरात उपलब्ध असलेल्या पेशींचा आपल्याला तरुण ठेवण्यासाठी एक बॅकअप असतो आणि आपण विज्ञानाद्वारे त्याचा वापर करायला शिकलो आहोत. रिव्हर्स एज आणि बायो स्विचचे तंत्रज्ञान आपल्या अपेक्षेपेक्षा वेगाने विकसित होत आहे.

डॉ. सिंक्लेअर म्हणाले की 20 वर्षांपूर्वी, “व्यक्ती कधीही वृद्ध होत नाही” असं कोणी बोलायचो तेव्हा त्याला वेडं समजलं जायचं”. पण आता आपल्याला त्याचं महत्त्व समजलं आहे. आपल्याला तरुण ठेवण्याचं सूत्र आपल्या शरीरातच आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp