ठाणे तपास पथकाकडून परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, नोंदवला चार पानी जबाब

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आज परमबीर सिंग यांचा चार पानी जबाब नोंदवला आहे. तपास अधिकाऱ्यांनी आज परमबीर सिंग यांची सात तास चौकशी करण्यात आली. डीसीपी अविनाश अंबुरे यांच्या उपस्थितीत ही चौकशी झाली. ठाण्याच्या विशेष तपास पथकाने त्यांना पुढच्या चौकशीसाठी नोटीसही बजावली आहे. आज सिंग यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. सोना जलान, केतन तन्ना, किरण माला या प्रकरणात ठाणे विशेष तपास पथकाने चौकशी केली.

आज नेमकं काय घडलं?

सोनू जालान खंडणी प्रकरणात ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंघ यांची आज 7 तास चौकशी केली या चौकशीला सामोरे जात परमबीर सिंग यांच्या वर असणारे सर्व आरोप परमबीर सिंग यांनी नाकारले. आज चार पानांचा जबाब ठाणे नगर पोलिसांनी नोंदवला तर SIT टीम समोर ही सर्व चौकशी झाली. पुढील चौकशी साठी कधीही बोलवून चौकशी केली जाईल अशी नोटीस ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांना बजावली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परमबीर सिंग यांनी आज झालेल्या चौकशी दरम्यान पोलिसांना सहकार्य केले असल्याची माहिती यावेळी उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या चौकशी नंतर आता पुढील चौकशी साठी परमबीर सिंग हे CID समोर जाण्याची शक्यता आहे. आज चौकशी दरम्यान परमबीर सिंह हे ठाणे न्यालयात गेले होते. तर महत्वाचे म्हणजे परमबीर सिंग यांच्या विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने रद्द केले आहे. ठाणे कोर्टाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत.

त्यामुळे सध्या तरी परमबीर सिंह यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंह यांना जेव्हा तपास अधिकारी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा सिंह यांनी चौकशीसाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच 15 हजाराच्या वैयक्तिक जामिनावर त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. गेले अनेक दिवस परमबीर सिंग यांच्या प्रकृतीमुळे ते समोर येत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले तर परमबीर सिंग याना पुढील चौकशी साठी न्यायालयात कधीही हजर राहावे लागेल अशी माहिती परमबीर सिंग यांचे वकील राजेंद्र मोकाशी यांनी यावेळी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT