अदृष्य हात केतकीला टार्गेट करत आहेत, जामीन अर्जात अभिनेत्रीच्या वकिलांनी काय बाजू मांडली?

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयात केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी जामीन अर्ज दाखल केला असून यात काही अदृष्य हात केतकीला टार्गेट करत असल्याचं वकीलांनी म्हटलं आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्जावरचा निर्णय राखून ठेवला आहे.

ADVERTISEMENT

या घटनेत तक्रारदारांना केतकी चितळेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा अधिकार नाहीये कारण तिची फेसबूक पोस्ट ही पवार या व्यक्तीबद्दलची आहे. पवार नावाच्या एकाही व्यक्तीने या प्रकरणात तक्रार दाखल केलेली नसल्याचं वकीलांनी म्हणलं आहे. अशा प्रकरणामध्ये मानहानी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो परंतू केतकीला झालेली अटक ही राजकीय कारणांमुळे झाल्याचं केतकीच्या वकिलांनी जामीन अर्जात म्हटलं आहे.

Code of Criminal Procedure च्या Section 41A प्रमाणे नोटीस दिल्याशिवाय पोलिसांना केतकीला अटक करण्याचा अधिकार नसल्याचंही वकीलांनी म्हटलं आहे. अदखलपात्र गुन्हा असल्यामुळे IPC च्या 500 कलमाअंतर्गत केतकीला अटक करता येत नसल्याचंही केतकीच्या वकीलांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतल्यामुळे जिथे-जिथे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्या पोलिसांकडे तिचा ताबा मागितला जाईल. त्यामुळे काही अदृष्य हात केतकीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या वकिलांनी जामीन अर्जात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पवार साहेब मोठे नेते आहेत, वय पाहून वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं – पंकजा मुंडे

या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एका पद्धतीने भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवार या नावाविरुद्ध कोणीही कधीही काही बोललं तर त्याच्यावर अशी कारवाई होईल हे यातून दाखवण्यात येत असल्याचं केतकीच्या वकीलांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवर पवार यांना उद्देशून शेअर केलेली एक कवीता चांगलीच चर्चेत होती. या कवितेत पवारांच्या शारिरिक व्यंगाबद्दल टिप्पणी करण्यात आली असल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकीविरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत. ज्यानंतर केतकीला अटक करण्यात आली. सध्या केतकीचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्याकडे आहे. दरम्यान केतकीच्या जामीन अर्जावर ठाणे सत्र न्यायालय 20 तारखेला सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर आपला निर्णय सुनावणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT