मनसेचं मध्यरात्री खळ्ळ खट्यॅक! आयपीएल खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बस फोडल्या
लवकर आयपीएल स्पर्धा सुरू होत असून, आयपीएलमधील खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीएलचा १५ हंगाम लवकरच सुरू होत असून, तयारी जोरात सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी विशेष बसेस असणार आहेत. या बसेस महाराष्ट्राबाहेरून मागवण्यात […]
ADVERTISEMENT

लवकर आयपीएल स्पर्धा सुरू होत असून, आयपीएलमधील खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आयपीएलचा १५ हंगाम लवकरच सुरू होत असून, तयारी जोरात सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी विशेष बसेस असणार आहेत. या बसेस महाराष्ट्राबाहेरून मागवण्यात आल्यानं मनसेनं याला विरोध दर्शवला आहे.
आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी आणण्यात आलेल्या बसेस महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी घडली. ताज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या या बसेसची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. १५ मार्चच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.
बसेसवर पोस्टर लावत मनसेच्या कार्यकर्त्यांना तोडफोड केली असून महाराष्ट्रात मराठी वाहतूकदारांना काम मिळालं पाहिजे, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेचा दणका अशा आशयाचे पोस्टर बसेसवर लावण्यात आले होते.










