नुसरत जहांने केलं दुसरं लग्न?; इन्स्टाग्रामवर यश दासगुप्तासोबत फोटो केला शेअर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट झाल्याच्या चर्चेनंतर नुसरतने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता नुसरत जहांने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोतून दुसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे. नुसरतने पहिल्यांदाच यश दासगुप्ता पती असल्याचं मान्य केलं आहे.

अभिनेत्री नुसरत जहांने काही महिन्यांपूर्वी निखिल जैनसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, घटस्फोटाच्या घोषणेनंतर नुसरतने एका मुलाला जन्म दिला. मात्र, या मुलाच्या पिता कोण यावरून नुसरतला प्रश्न विचारले जात होते. त्यातच मुलाच्या जन्मदाखल्यावर यश दासगुप्ताचं नाव आल्यानं हे मुल त्याचं असल्याचं म्हटलं जात होतं.

अखेर अभिनेत्री नुसरत जहांने पहिल्यांदाच यश दासगुप्तासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे. नुसरत जहांने यश दासगुप्ता पती असल्याचं सार्वजनिकपणे मान्य केलं आहे. अभिनेत्रीने यश दासगुप्ताच्या वाढदिवसाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नुसरत जहांने इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत. केक आणि यश दासगुप्तासोबत डिनर डेटचा फोटो शेअर केले आहेत. केक दोन भागांमध्ये असून, केकच्या वरच्या भागामध्ये हसबंड (पती) असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यावर एक कपल शॅडोही आहे.

ADVERTISEMENT

केकच्या खालच्या भागामध्ये डॅड असं लिहिलेलं असून, एक लहान मुलगा आणि वडील अशी शॅडो स्वरूपात तयार करण्यात आलेलं आहे. याबरोबरच नुसरतने यश दासगुप्तासोबत डिनर डेटचा फोटो शेअर केला आहे. ‘हॅप्पी बर्थडे माय लव’, असंही या फोटोमध्ये म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

नुसरतने 26 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. मात्र, आई होण्याच्या काही दिवस आधीच नुसरत आणि निखिल जैन यांनी वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. भारतीय कायद्यानुसार आमचं लग्न अधिकृत नसल्याचं नुसरतने म्हटलेलं होतं.

घटस्फोटाच्या घोषणेनंतर निखिल जैनने मुलं आपलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मुलाचा बाप कोण असा प्रश्न विचारून नुसरत जहांला ट्रोल केलं जात होतं. तर यश दासगुप्तासोबत नुसरत रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता नुसरतने यश दासगुप्ताचा उल्लेख पती असा करत सार्वजनिक जीवनात यश पती असल्याचं कबूल केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT