Pegasus Phone Tapping चा उपयोग महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी होतो आहे का?
देशात आणि राज्यात रविवारपासून पेगासस या स्पायवेअरची चर्चा आहे. देशातल्या जवळपास 300 नेत्यांचं, विरोधी पक्षातील मंडळींचं, पत्रकारांचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांचं फोन टॅपिंग या स्पायवेअरचा उपयोग करून केलं गेलं आहे असा आरोप होतो आहे. महाराष्ट्रातही याचा वापर झाला का? अशी चर्चा रंगली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर संजय राऊत […]
ADVERTISEMENT

देशात आणि राज्यात रविवारपासून पेगासस या स्पायवेअरची चर्चा आहे. देशातल्या जवळपास 300 नेत्यांचं, विरोधी पक्षातील मंडळींचं, पत्रकारांचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांचं फोन टॅपिंग या स्पायवेअरचा उपयोग करून केलं गेलं आहे असा आरोप होतो आहे. महाराष्ट्रातही याचा वापर झाला का? अशी चर्चा रंगली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर संजय राऊत यांनीही या फोन टॅपिंगवरून भाजपवर आणि फडणवीस सरकारवर आरोप केले आहेत. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. असं कोणतंही फोन टॅपिंग माझ्या काळात झालेलं नाही.
महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा उपयोग केला जातो आहे असं काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अशाच प्रकारचा आरोप केला आहे. विरोधकांवर पाळत ठेवून भारतातलं राजकारण पाळत ठेवण्याचं राजकारण सुरू आहे. अशा प्रकारे खरंच घडलं आहे का? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना काय वाटतं ते आम्ही जाणून घेतलं आहे.
साहिल जोशी: पेगाससचा स्पायवेअरचा उपयोग हा महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी केला जातो आहे का? ज्या 16 वृत्तपत्रांनी ही स्टोरी ब्रेक केली आहे त्यांनी तथ्याचा आधार घेतलेला नाही. या सगळ्याबाबत काय सांगाल? या सगळ्याकडे कसं पाहता?
गिरीश कुबेर : या बातमीच्या मागे काय आहे आणि पुढे काय होणार हे समजून घेण्यासाठी ते तंत्रज्ञान समजून घ्यायला हवं. NSO ही जी कंपनी आहे ती हे स्वतःच सांगते आहे की हे स्पायवेअर सॉफ्टवेअर आम्ही सरकार किंवा सरकारी यंत्रणा वगळली तर कुणालाही विकत नाही. इस्रायलच्या म्हणण्यानुसार पेगासस सॉफ्टवेअर विकणं म्हणजे शस्त्रास्त्रं विकणं इतकं गंभीर आहे. शस्त्रास्त्र जशी खासगी व्यक्तींना विकली जात नाहीत तसंच हे सॉफ्टवेअर फक्त सरकारी यंत्रणांना विकलं जातं हे हे कंपनीने म्हटलंय