काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?
काँग्रेस पक्षात बंडाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे कारण कपिल सिब्बल यांनी घेतलेली परिषद. पक्षाला अध्यक्षच नाही त्यामुळे निर्णय कोण घेतंय हे आम्हाला माहित आहेही आणि नाहीही.. अशा काहीशा द्विधा मनस्थितीत काँग्रेसचे हे दिग्गज आहेत. याबाबत मनिष तिवारी यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं हे आहे की ‘काँग्रेसमध्ये राहून आम्ही काँग्रेसला वाचवण्याचा […]
ADVERTISEMENT

काँग्रेस पक्षात बंडाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे कारण कपिल सिब्बल यांनी घेतलेली परिषद. पक्षाला अध्यक्षच नाही त्यामुळे निर्णय कोण घेतंय हे आम्हाला माहित आहेही आणि नाहीही.. अशा काहीशा द्विधा मनस्थितीत काँग्रेसचे हे दिग्गज आहेत. याबाबत मनिष तिवारी यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं हे आहे की ‘काँग्रेसमध्ये राहून आम्ही काँग्रेसला वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे’ असं G23 मधल्या नेत्यांनीही वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाला कसं वाचवायचं हे आमच्यासमोरचं ध्येय आहे असं मनिष तिवारी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना हटवण्यात आलं आहे. विश्वासात घेतलं गेलं नाही असं दिसतं आहे.
कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी यांना आणण्यात आलं मात्र त्यासाठी G23 मधल्या नेत्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही असाही एक सूर आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष नाहीत. मात्र निर्णय ते घेत आहेत याबाबत काहींच्या मनात नाराजी आहे हे दिसून येतं आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घ्यावी आणि मग निर्णय घ्यावेत इतकंच या जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे. त्यांना काँग्रेस सोडून कुठेही जायचं नाही. काँग्रेससाठी हाय कमांड कल्चर कधीच नवं नाही. त्यांना आदेश मानण्याची सवय आहे. त्यामुळे कपिल सिब्बल जरी हे म्हणत असले की जी हुजुरी करणार नाही तरीही त्याचा अर्थ निर्णय घेताना आम्हालाही विश्वासात घेतलं गेलं पाहिजे असा आहे.
आता आणखी एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती अशी की…हाय कमांडचे आदेश आले की ते झेलायचे हे निवडणुका जिंकेपर्यंत व्यवस्थित चालत होतं. आता तुम्ही निवडणूकही जिंकत नाही आणि तुम्हाला आदेशही द्यायचे आहेत, निर्णयही घ्यायचे आहेत तेही कुणाला विश्वासात न घेता असं कसं चालेल? असा एक सूर उमटताना दिसतो आहे. नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबात आणलं त्यांनी आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी असं का केलं याचं उत्तर कोण देणार? अशा निर्णयांच्या बाबतीत उत्तर कोण देणार हा प्रश्न काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांना पडला आहे. थोडक्यात या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करायचं झालं तर राहुल गांधी विरूद्ध ज्येष्ठ काँग्रेस नेते किंवा G23 चे नेते असं वातावरण आत्ता आपल्याला दिसून येतं आहे.