पार्थ पवारांच्या कंपन्यांवर IT Raid , आयकर विभागाच्या रडारवर ‘पवार’

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढत आहेत असं दिसतं आहे याचं कारण आता आता आयकर विभागाने पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या आहेत. अनंत मर्क प्रा. लिमिटेड या कंपनीवर आयकर विभागाने छापा मराल आहे. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र आहेत. आजच अजित पवार यांच्या बहिणींशी संबंधित असलेल्या कंपन्या आणि घरांवर छापेमारी झाली आहे. अशात आता अजित पवार कुटुंबीय हे आयटी विभागाच्या रडारवर आहेत असंच चित्र आहे.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारी सुरु आहे.

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

‘जरंडेश्वरची मालकी कुणाची हे अजित पवारांनी सांगावं’ आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोमय्या आक्रमक

ADVERTISEMENT

आयकर विभागाने राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यासह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर देखील आज (7 ऑक्टोबर) अचानक छापे मारले. यावेळी आयकर विभागाने मारलेल्या या छाप्यांबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर हे सगळे छापे फक्त राजकीय हेतूने मारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि कारखान्यांवर मारलेल्या छापेमारीविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. फक्त त्या माझ्या बहिणी आहेत या हेतून झालेली ही कारवाई आहे असंही अजित पवार म्हणाले.

‘मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं..’

‘आयकर विभागाने माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापा मारला याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. पण मला एका गोष्टीचं खूप दु:ख झालं. ते म्हणजे माझ्या तीन बहिणींच्या घरावर कारखान्यांवर देखील छापे मारण्यात आले.’

‘या तीनही बहिणींची 35 ते 40 वर्षापूर्वी लग्न झालेली आहेत. त्यातील एक बहीण कोल्हापूर आणि दोन पुण्यातील आहेत. त्यांच्या कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या. आता यामागचं मला कारण माहिती नाही. त्या आपलं जीवन व्यवस्थित आपलं जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झालेली आहेत, नातवंडं आहेत. पण फक्त अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर आयकर विभागाने धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा विचार करावा. कोणत्या पातळीवर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे देखील जनतेनं पाहावं.’ असंही अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT