मुंबईतल्या महिलेचा मृतदेह जयपूरमधल्या हॉटेलमध्ये आढळल्याने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या एका २९ वर्षीय महिलेचा मृतदेह जयपूरमधल्या हॉटेलमध्ये आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रोशनी प्रकाश सिंग असं या महिलेचं नाव आहे. बुधवारी संध्याकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या रूमचा दरवाजा नॉक केला. मात्र काहीही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांनी इंटरकॉमद्वारे तिच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र रोशनीने इंटरकॉमही उचलला नाही.

ADVERTISEMENT

यानंतर हॉटेलने पोलिसांना बोलावलं. करधानी पोलीस ठाण्याचे पोलीस हॉटेलमध्ये आले. त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना रोशनीचा मृतदेह रूममध्ये आढळला. खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली, तसंच रूमही तपासली आहे मात्र त्यांना सध्या तरी संशयास्पद काही आढळलं नाही. मुंबईतली ही महिला जयपूरला कशासाठी आली होती? याचाही शोध घेतला जातो आहे. तसंच मृत्यूप्रकरणीही तपास सुरू आहे.

कल्याण: निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत केली आत्महत्या

हे वाचलं का?

या महिलेकडे एक डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी आढळली आहे. त्यातलं औषध हे अस्थमासाठी होतं. रोशनी त्याआधीही जयपूरला तिच्या आईसोबत आली होती असंही कळलं आहे. बहुदा अस्थमावर उपचार करण्यासाठीच ती आली असावी असा अंदाज पोलिसांना आहे.

या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं ते स्पष्ट होऊ शकणार आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

रोशनी सिंग ही महिला मुंबईत कुठे राहते? ती जयपूरला का आली होती? या प्रश्नांचीही उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तसंच ती हॉटेलमध्ये थांबली तेथील कर्मचाऱ्यांनाही विचारणा करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास या महिलेचा मृतदेह आढळला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT