PM Narendra Modi: “भारतीय जवान हेच माझं कुटुंब, यापेक्षा गोड दिवाळी असूच शकत नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची दिवाळी दरवर्षी भारतीय सैनिकांसोबत साजरी करतात. यंदाही दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरमधल्या कारगील द्रास येथे भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावळेला त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. तसंच सैनिकांना संबोधित करताना आम्ही शांततचे पुरस्कर्ते आहोत आम्हाला युद्ध नको आहे. आमच्यासाठी युद्ध हा शेवटचा पर्याय आहे मात्र शत्रूला आम्ही जशास तसं उत्तर देऊ असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर

देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. भ्रष्टाचारी कितीही ताकदवान असो तो वाचवणार नाही. कुशासनामुळे विकासाला खिळ बसली. आपल्यासाठी युद्ध हा पहिला पर्याय कधीच नाही. तसे आपल्यावर संस्कार आहेत. युद्ध हा आपल्यासाठी शेवटचा पर्याय आहे. लंकेतलं युद्ध असो किंवा कुरूक्षेत्रातील युद्ध असो ते शेवटपर्यंत टाळण्याचाच प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आपला देश विश्वशांतीचे समर्थक आहोत. शांतता सामर्थ्याविना शक्य नसते. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे. रणनीती आहे. कुणीही आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसं उत्तर देण्यास समर्थ आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर आकाशही झुकतं. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचं प्रतीक आहे. शिखरावर बसलेला शत्रूही भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर छोटा होतो. भारताचे सैनिक सीमेचे रक्षक असून देशाचे आधार स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातले लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते. अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासात असतो तेव्हाच देश सुरक्षित असतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

जो देशाकडे वाकडी नजर करेल त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल

जो देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याला आमच्या भारतीय सैन्याची तिन्ही दलं जशास तसं उत्तर देतील. त्यांना पराभवाची धूळ चारली जाईल. जेव्हा आपला जवान स्वदेशी हत्याराने शत्रूला उत्तर देईल तेव्हा शत्रूचा पराभवच होईल. तसंच भारतीय जवानाची हिंमत आणखी वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात एक कविता असते. या कवितेने जवानांना स्फुरण देण्याचं काम केलं. या कवितेत ब्राम्होसची ताकद आणि तेजसच्या उड्डाणाचंही वर्णन केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT