याला म्हणतात प्रेम! मित्राशी लग्न व्हावं म्हणून राजकुमारीने सोडली कोट्यवधींची संपत्ती!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जपानची राजकुमारी माको हिने आपल्या मित्राशी लग्न करता यावं म्हणून कोट्यवधींची संपत्ती, ऐषोआराम हे सगळं सोडलं आहे. शाही परीवार सोडल्यानंतर मिळाणारी लाखो डॉलर्सची संपत्तीही तिने नाकारली आहे. राजकुमारी माकोचं तिच्या लहानपणापासूनच्या मित्रावर प्रेम आहे. तो सामान्य कुटुंबातील आहे. त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून तिने सगळ्या ऐश्वर्यावर पाणी सोडलं आहे.

ADVERTISEMENT

जपानचे माजी सम्राट अकिहितो यांची नात राजकुमारी माको हिने 2017 मध्येच तिचा मित्र केई कोमुरो सोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केई कोमुरो आणि त्याच्या आईमध्ये आर्थिक वाद सुरू झाल्याने हे लग्न काही काळ टळलं होतं. मात्र आता हे लग्न ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतं. त्यासाठीच राजकुमारी माकोने आपल्या संपत्तीवर, ऐश्वर्यावर पाणी सोडलं आहे.

हे वाचलं का?

शाही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने जर सामान्य मुलाशी लग्न केलं तर तिचा शाही दर्जा काढून घेतला जातो. तो दर्जा काढून घेतल्यावर त्या मुलाला किंवा मुलीला दहा कोटी रूपये भरपाई म्हणून मिळतात. मात्र ही भरपाई म्हणून मिळणारी रक्कम राजकुमारी माकोने नाकारली आहे. जपान सरकारनेही याबाबत राजकुमारी माकोचं कौतुक केलं आहे.

केई कोमुरोने 2013 मध्येच राजकुमारी माकोला प्रपोज केलं होतं. तिने त्याला होकार दिला. 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडाही झाला. मात्र गेल्या चार वर्षांपासून केईच्या कुटुंबातील काही वादांमुळे लग्न टळलं होतं. आता मात्र हे दोघे लग्न करतील आणि जपानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हे दोघे लग्नानंतर अमेरिकेला जाऊन स्थायिक होणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राजकुमारी माकोने तिच्या मित्रासोबत असलेलं तिचं नातं हे 2013 ते 2017 या कालावधीत गुप्त ठेवलं होतं. याबाबत तिने फारशी कुणाकडे वाच्यता केली नव्हती. तिने जेव्हा हे तिच्या घरी सांगितलं तेव्हा तिच्या घरीही वाद झाला झाला. मात्र प्रदीर्घ वाद, चर्चा यानंतर क्राऊन प्रिन्सेनी माकोच्या लग्नासाठी होकार दिला. माकोच्या वडिलांनीही तिचा निर्णय मान्य केला.

माकोने तिच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा असं स्वातंत्र्य त्यांनी तिला दिलं. दरम्यान आता माकोने सामान्य कुटुंबातील मुलाशी लग्नाचा निर्णय घेतल्याने तिचा शाही दर्जा संपला आहे. मात्र याची पर्वा न करता तिने आपल्या मतावर ठाम राहात आपल्या मित्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोई कोमुरो समुद्र पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे राजकुमारी माकोने एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की आम्ही आता वेगळे राहू शकत नाही. त्यानंतर काही दिवसातच या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. याआधी माकोची आत्या राजकुमारी सयाको यांनीही शाही दर्जा आणि आपलं राजकुमारीचं पद आपलं प्रेम मिळवण्यासाठी सोडलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT