धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून तरूणीला धावत्या ट्रेनसमोर ढकललं
एकतर्फी प्रेमातून तरूणीला धावत्या ट्रेनसमोर ढकलण्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. या घटनेत ही तरूणी फक्त नशीब बलवत्तर असल्याने वाचली. तिला गंभीर जखमा झाल्या आहेत. तरूणीला ढकलणारा तरूण तिथून पळून गेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबईतल्या खार स्टेशनवर हा प्रकार घडला. मात्र या तरूणीला ढकलणाऱ्या तरूणाला मुंबई जीआरपी पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक […]
ADVERTISEMENT
एकतर्फी प्रेमातून तरूणीला धावत्या ट्रेनसमोर ढकलण्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. या घटनेत ही तरूणी फक्त नशीब बलवत्तर असल्याने वाचली. तिला गंभीर जखमा झाल्या आहेत. तरूणीला ढकलणारा तरूण तिथून पळून गेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबईतल्या खार स्टेशनवर हा प्रकार घडला. मात्र या तरूणीला ढकलणाऱ्या तरूणाला मुंबई जीआरपी पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली. सुमेध जाधव असं या तरूणाचं नाव आहे तो मुंबईतल्या वडाळा भागात राहतो.
ADVERTISEMENT
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चौगुले यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. “ज्या तरूणीला ढकलण्यात आलं ती तरूणी आणि तिला ढकलणारा सुमेध या दोघांची ओळख दोन वर्षांपूर्वीच झाली होती. हे दोघे एकाच ठिकाणी काम करतात. या दोघांची चांगली मैत्रीही झाली होती. मात्र काही दिवसांनी तरूणीला समजलं की सुमेधला दारू पिण्याचं व्यसन आहे. त्यामुळे तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरूवात केली. मात्र सुमेध तिच्या मागे लागला होता, तिला त्रासही देत होता. यासंदर्भात या तरूणीने काही वेळा पोलिसात तक्रारीही केल्या होत्या.”
शुक्रवारी संध्याकाळी या तरूणीने अंधेरीहून खारला जाणारी ट्रेन पकडली आणि प्रवास सुरू केला. यावेळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. ही तरूणी जेव्हा खार स्टेशनला उतरली तेव्हा तिच्या पाठीमागे सुमेधही आला. सुमेध आपला पाठलाग करतो आहे हे या तरूणीला समजलं होतं म्हणून तिने प्रवासादरम्यान फोन करून आपल्या आईला खार स्टेशनवर मदतीसाठी बोलावलं. खार स्टेशनवर जेव्हा ही तरूणी उतरली तेव्हा तिच्या मागे सुमेध आला आणि आत्ता माझ्यासोबत चल मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणत धमकावू लागला. मात्र या तरूणीने सुमेधसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सुमेधने तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी जीव देईन असंही तिला सांगितलं. एवढं सांगून तो थांबला नाही तर धावत्या ट्रेनसमोर उडी मारण्यासाठी तो धावलाही पण लगेच परत आला. त्याने या तरूणीला खेचलं आणि धावत्या ट्रेनसमोर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये ढकललं. हे सगळं घडेपर्यंत तरूणीची आईही तिथे आली होती. तिने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. या सगळ्या घटनेत तरूणीच्या डोक्याला जखमा झाल्या. तरूणीला ढकलल्यानंतर सुमेधने तिथून पळ काढला असंही विजय चौगुले यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
या सगळ्या प्रकरणात अवघ्या बारा तासांमध्ये सुमेधला अटक करण्यात आली. जखमी झालेल्या तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या डोक्याला बारा टाके पडले आहेत. त्यानंतर तिला मलमपट्टी करून घरी सोडण्यात आलं. आरोपी सुमेधला या प्रकरणी कोर्टात हजर करण्यात आलं अशीही माहिती विजय चौगुले यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT