काँग्रेसच्या वरिष्ठ लोकांनी दिशाभूल करणं थांबवावं – जे.पी.नड्डांचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना केंद्रात सत्तेवर असलेला भाजप आणि विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे. सध्याच्या काळात काँग्रेसचं वागणं हे आश्चर्य वाटण्यासारखं नाही पण दुःखद नक्कीच आहे असा टोला नड्डा यांनी लगावला आहे.

सध्याच्या घडीला देश कोरोनाशी लढत असताना काँग्रेसचं वागणं हे दुःखद असलं तरीही मला याबद्दल फारसं आश्चर्य वाटत नाही. तुमच्या पक्षातील काही सदस्य कोरोनाचा सामना करताना कौतुकास्पद कामगिरी बजावत आहेत. परंतू पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून नकारात्मकता पसरवली जात असल्यामुळे अशा लोकांचं काम झाकोळलं जात आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.

सध्याच्या घडीला भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी शौर्याने लढतो आहे. अशावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिशाभूल करणं, दहशत पसरवणं, विरोधाभास होईल अशा भूमिका घेणं थांबवावं. भाजप आणि NDA चं सरकार असलेल्या राज्यांत गरिब आणि वंचितांना मोफत लस देण्याचा संकल्प आम्ही घेतलाय. काँग्रेस सरकारलाही असंच वाटत असावं…असं म्हणत नड्डांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना टोले लगावले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT