PAN-Aadhaar मोफत लिंक करण्यासाठी उरले अवघे काही तास, पाहा कसं करता येणार लिंक

मुंबई तक

मुंबई: जर आपण अद्याप आपलं पॅनकार्ड हे आधारशी लिंक केलेलं नसेल तर आपल्याकडे आता मोफत पॅन-आधार लिंक करण्यासाठी फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी मोफत लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच आजच आपल्याला हे काम करावं लागेल. अन्यथा यापुढे त्यासाठी पैसे मोजावे लागतील. वास्तविक, पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: जर आपण अद्याप आपलं पॅनकार्ड हे आधारशी लिंक केलेलं नसेल तर आपल्याकडे आता मोफत पॅन-आधार लिंक करण्यासाठी फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी मोफत लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच आजच आपल्याला हे काम करावं लागेल. अन्यथा यापुढे त्यासाठी पैसे मोजावे लागतील.

वास्तविक, पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ही वर्षभराने म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पण आता त्यासाठी पैसे मोजावे लागतील. त्यामुळे 31 मार्चनंतर पॅनकार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 रुपये मोजावे लागू शकतात.

जर आपण वेळेपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास त्याचा मोठा तोटा आहे. तो म्हणजे जर तुम्ही 31 मार्चनंतर लिंक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 500 रुपये लेट फी म्हणून द्यावी लागेल. ITR फायलिंगपासून बँकेच्या KYC पर्यंत पॅनकार्ड आणि आधार या दोन्ही गोष्टी प्रत्येक ठिकाणी आवश्यक असतं. दोन्ही कागदपत्रांपैकी एक तरी गोष्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे.

वास्तविक, पॅन कार्ड प्रत्येक आर्थिक कामासाठी एक महत्त्वपूर्ण असा पुरावा आहे. बँक खाते उघडण्यासाठी आणि इतर गुंतवणुकीसाठी देखील पॅनकार्ड आवश्यक आहे. याशिवाय 50,000 रुपयांच्या वरील व्यवहारांसाठी देखील पॅनकार्डही हे गरजेचं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp