हिंदी नाही तर संस्कृत ही आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे, कंगनाचं रोखठोक मत
Kangana Ranaut reaction Hindi Language Controversy: अभिनेत्री कंगनाच्या धाकड या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. एवढंच नाही तर किच्चा सुदीपने कर्नाटक तकला दिलेल्या मुलाखतीवरही कंगनाने भाष्य केलं. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही असं किच्चा सुदीप कर्नाटक तकच्या मुलाखतीत म्हणाला होता. ज्यानंतर अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये ट्विटर वॉर रंगलं. आता […]
ADVERTISEMENT
Kangana Ranaut reaction Hindi Language Controversy: अभिनेत्री कंगनाच्या धाकड या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. एवढंच नाही तर किच्चा सुदीपने कर्नाटक तकला दिलेल्या मुलाखतीवरही कंगनाने भाष्य केलं. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही असं किच्चा सुदीप कर्नाटक तकच्या मुलाखतीत म्हणाला होता. ज्यानंतर अजय देवगण आणि किच्चा सुदीपमध्ये ट्विटर वॉर रंगलं. आता कंगनानेही राष्ट्रभाषेच्या वादात उडी घेतली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाली कंगना?
हे वाचलं का?
मला जर दोन मिनिटं दिलीत तर मी या वादावर आपलं मत देऊ इच्छिते. जी आपली सिस्टिम आहे किंवा जो समाज आहे त्यामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात. विविध प्रकारच्या संस्कृती, विविध प्रकारचे लोक, त्यांची विविध नाती आणि विविध भाषा आहेत. प्रत्येकाचे आपले आपले जन्मसिद्ध अधिकार आहेत. ज्या प्रमाणे मी पहाडी आहे त्यामुळे मला माझ्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. मात्र आपला देश हे एखाद्या युनिटसारखा आहे. आपल्याला एक समान धागा हवा हा समान धागा आपल्याला बांधून ठेवतो.
ADVERTISEMENT
आपण सगळे जण संविधानाचा आदर करतो. या संविधानाने आपल्याला हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं सांगितलं. पण नीट विचार केला तर तमिळ भाषा ही हिंदीपेक्षाही जुनी भाषा आहे. त्याही आधीची भाषा आहे संस्कृत. राष्ट्रभाषेच्या वादावर जर तुम्ही माझं मत विचारल असाल तर मला हेच वाटतं की आपली राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे.
ADVERTISEMENT
कंगना पुढे म्हणाली की ”कन्नड, तमिळ, गुजराती, हिंदी या सगळ्या भाषांचा उगम संस्कृत आहे. संस्कृतऐवजी हिंदी आपली राष्ट्रभाषा का केली? याचं उत्तर माझ्याकडे नाही. हे त्यावेळी घेतलेले निर्णय आहेत जेव्हा खलिस्तानची मागणी केली जात होती. युवकांना आता भरकटवण्यात येतं आहे. लोक संविधानाचा अपमान करत आहेत. तमिळ लोक वेगळं राष्ट्र मागत आहेत. बंगाल रिपब्लिकची मागणी केली जाते आहे आणि हिंदी आम्ही राष्ट्रभाषा समजत नाही. हे तुम्ही हिंदीला नाही तर दिल्लीला नाकारत आहात. तिथे केंद्र सरकार नाही हेच तुम्ही एक प्रकारे म्हणत आहात. या सगळ्या वादाला अनेक पैलू आहेत.”
कंगना त्यापुढे जाऊन म्हणाली की हिंदीला विरोध करणारे लोक आपल्या संविधानाचा अपमान करत आहेत. दिल्ली सरकारचे सगळे व्यवहार हिंदीतून होतात. आपण जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा इंग्रजीतून बोलतो. आपल्या बोलण्याची भाषा हिंदी किंवा तमिळ असली तर काय हरकत आहे? राष्ट्र म्हणून हे आपल्यासारख्या लोकांनाच ठरवायचं आहे. आत्ता जर संविधानाचा विचार केला तर त्यात हेच म्हटलं आहे की आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे.
अजय देवगणने जे म्हटलं आहे की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्यात काही गैर नाही. जर कुणी हे म्हणत असेल की कन्नड, तमिळ या भाषा हिंदीपेक्षाही जुन्या आहेत तर त्यातही काही चुकीचं नाही. जर राष्ट्रभाषा कोणती हे मी ठरवायचं असेल तर मी संस्कृत हीच राष्ट्रभाषा ठरवेन. आपण संस्कृत ही आपली राष्ट्रभाषा का करू शकत नाही. संस्कृत भाषेला शाळेत अनिवार्य का केलं जात नाही?असाही प्रश्न कंगनाने विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT