Kareena Kapoor Video : घाबरलेली करीना आली, सगळ्यात आधी कुणाशी बोलली, व्हिडीओमध्ये नेमकं काय?
पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. त्यानंतर आता सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली

करीना कपूर घाबरली, महिलेला काय म्हणाली?
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानं तो गंभीर जखमी झाला असून, त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथकं रवाना केली आहेत. गुरुवारी पहाटे सैफ अली खानवर घरात घुसलेल्या व्यक्तिकडून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशानं घरी आलेल्या आरोपीने सैफवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. त्यानंतर आता सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओची चर्चा होत आहे.
एका व्हिडीओ समोर आला असून, करीना कपूर खान घाबरलेली दिसतेय. या घटनेनंतर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, करीना कपूर काळजीत दिसतेय. तिच्या आजूबाजूला उभे असलेले लोक काहीतरी बोलत असल्याचं दिसून येतंय. यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Live Updates : चाकू हाडापर्यंत गेला, डॉक्टरांनी सांगितलं शस्त्रक्रिया कशी केली? सैफ धोक्याच्या बाहेर?
मुंबई पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. सैफच्या घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. सध्या या सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांनी तपास सुरू केला असून, वांद्रे पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.