Crime : नवऱ्याला सोडून दिरासोबत थाटला संसार; रेल्वे स्टेशनवर सापडाला मृतदेह
Crime news in marathi : बंगळूरु : येथील एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकावरील एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, तमन्ना (27) असं या महिलेचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून कमाल, तनवीर आणि साकिब अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी नवाबसह […]
ADVERTISEMENT
Crime news in marathi :
ADVERTISEMENT
बंगळूरु : येथील एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकावरील एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान, तमन्ना (27) असं या महिलेचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून कमाल, तनवीर आणि साकिब अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी नवाबसह आणखी 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. (Crime: A woman’s body was found in a drum at M Visvesvaraya railway station)
दरम्यान, याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत तमन्नाची दोन लग्न झाली होती. तिचा इंतिखाब असं तिच्या दुसऱ्या नवऱ्याचं नावं होतं. तर तमन्नाचं याआधी इंतिखाबचा चुलत भाऊ अफरोजसोबत लग्न झालं होतं. अफरोजसोबत झालेल्या वादानंतर तिने घटस्फोट घेतला आणि अफरोजला सोडून इंतिखाबसोबत पळून गेली. यावरून इंतिखाब आणि बिहारमधील कुटुंबातील भावांमध्ये मतभेद झाले होते.
हे वाचलं का?
इंतिखाबचा भाऊ आणि आरोपी नवाब बेंगळुरूमध्ये काम करतो. त्याने 12 तारखेला इंतिखाब आणि तमन्नाला घरी जेवणासाठी बोलावले होते. जेवणानंतर नवाब आणि इंतिखाबमध्ये भांडण झालं. आरोपी नवाबने त्याला घर सोडण्यास सांगितलं आणि तमन्नाला बिहारला परत पाठवण्याचे आश्वासन दिले. ते आठ जण असल्यामुळे इंतिखाबचा नाईलाज झाला आणि तो पत्नीला सोडून घरी परतला.
Crime news: ओव्हरटेक केलं म्हणून महिलेला मारहाण; नागपूरमधील लाजिरवाणी घटना
ADVERTISEMENT
त्यानंतर आरोपींनी तमन्नाचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह एम विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकाजवळ ड्रममध्ये ठेवून बिहारला पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपींची ओळख पटवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्वजण बिहारमधील असून, अन्य पाच संशयित अद्याप बेपत्ता आहेत.
ADVERTISEMENT
Crime : लाखात पगार, घरी सुरळीत…; तरीही उच्चशिक्षित तरुणानं संपवलं आयुष्य
दरम्यान, यापूर्वीही दोन महिन्यांमध्ये याच परिसरात दोन हत्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाला सीरियल किलिंगशी जोडून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासानंतर यापूर्वी जानेवारी आणि डिसेंबरमध्ये झालेल्या दोन हत्यांशी या हत्येचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT