परळीत अजून एक मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगणार, करूणा मुंडेंची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

परळीतून पुन्हा एकदा मुंडे विरूद्ध मुंडे अशी लढत होणार आहे. पण यावेळेस धनंजय मुंडे यांना थेट करूणा मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी परळीतून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. आज करूणा धनंजय मुंडे यांनी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश केला. या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

हे सगळं गंभीर!; ‘करूणा शर्मा-धनंजय मुंडे’ प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य

काय म्हणाल्या करूणा धनंजय मुंडे?

हे वाचलं का?

‘माझी घोषणा वेगळी आहे की कार्यकर्ता आगे बढो… करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे.’ मी माझ्या लोकांची नेता झाली तर मी त्यांचा झेंडा उचलेन. मी आत्ता निवडणूक लढवण्याचा विचार केला नाही. मात्र जर कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली तर मी नक्कीच धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून आमदारकीची निवडणूक लढवेन. परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत रंगणार…’

‘मी व्यक्तिगत प्रकरणात काही भाष्य केलं नाही. ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी शांत आहे. मी माध्यमांना जाहीर न केलेल्या अनेक गोष्टी सांगणार आहे. पिक्चर अभी बाकी है…’ असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे या अप्रत्यक्ष इशाराही देऊन टाकला.

ADVERTISEMENT

रेणु शर्मा प्रकरणी धनंजय मुंडे यांना दिलासा

ADVERTISEMENT

धनंजय मुंडेंपेक्षा राज्यात करुणा मुंडेंच्याच नावाची चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सुरु आहे. कुठेही न्याय मिळत नाहीये. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासाठी आंदोलने करावी लागत आहेत. हे राजकारण संपवण्यासाठी मी एक मोहीम सुरु केली आहे. घराणेशाहीचे राजकारण मला संपवायचे आहे. अन्यायाविरुद्ध मी मोहिम सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून मी एक-एक कार्यकर्त्यांना जोडणार आहे. असंही करूणा मुंडे म्हणाल्या.

आणखी काय म्हणाल्या करूणा धनंजय मुंडे?

‘माझ्या पतीला मी सांगायचे की तुमच्यावर इतिहास रचला जाईल. पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पतीवर नाही तर माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे जिने आपल्या पतीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री असणाऱ्या पतीने दोन मुलांची आई असणाऱ्या मला 16 दिवस तुरुंगात पाठवले. महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे.’

‘जास्तीत जास्त महिलांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. मी महिलांना एकच सांगेल की या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT