लोकल ट्रेन पकडताना तोल गेला, KDMC आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकल ट्रेन ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन म्हणून मानली जाते. रेल्वे स्टेशनवर अनेकदा धावती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करु नका अशी सूचना केली जात असते. शनिवारी डोंबिवली स्थानकात दोन जवानांनी चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले होते.

परंतू शनिवारी असाच एक प्रकार डोंबिवली स्थानकात घडला, ज्यात कल्याण-डोंबिवलीच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

डोंबिवली : ट्रेन पकडताना तोल गेला, ट्रॅक खाली जाणाऱ्या महिलेला दोन जवानांनी वाचवलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नामदेव गावित (वय ५६) असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. गावित हे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय विभागात कामाला होते. ड्रेसर म्हणून काम करणारे गावित शनिवारी आपल्या अर्ध्या दिवसाचं काम संपवून घरी निघाले होते.

चंद्रपूर : कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, २० जणं जखमी

ADVERTISEMENT

डोंबिवली स्थानकात दुपारी १ वाजून ३ मिनीटांनी अंबरनाथला जाणारी लोकल गावित पकडायला गेले. मात्र तोपर्यंत लोकल सुरु झाल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि तोल गेल्यामुळे ते गाडीसोबत फरफटत गेले. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये तोल जाऊन पडल्यामुळे गावित यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावित यांचा मृतदेह कल्याणच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT