विद्यार्थ्याला पेन फेकून मारला; शिक्षिकेला निवृत्तीनंतर एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा
वर्गात गप्पा मारणाऱ्या विद्यार्थ्याला पेन फेकून मारणं एका शिक्षिकेला चांगलंच भोवलं. शिक्षिकेने विद्यार्थ्याला पेन फेकून मारला, पण त्यामुळे आता सश्रम तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तिरुवनंतपुरुम येथील न्यायालयाने शिक्षिकेला एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. निवृत्त झाल्यानंतर शिक्षिकेला तुरुंगात जावं लागणार आहे. शेरिफा शहाजहान असं या शिक्षिकेचं नाव आहे. शिक्षिकेनं पेन फेकून मारल्यानंतर तो विद्यार्थ्याच्या […]
ADVERTISEMENT

वर्गात गप्पा मारणाऱ्या विद्यार्थ्याला पेन फेकून मारणं एका शिक्षिकेला चांगलंच भोवलं. शिक्षिकेने विद्यार्थ्याला पेन फेकून मारला, पण त्यामुळे आता सश्रम तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तिरुवनंतपुरुम येथील न्यायालयाने शिक्षिकेला एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. निवृत्त झाल्यानंतर शिक्षिकेला तुरुंगात जावं लागणार आहे.
शेरिफा शहाजहान असं या शिक्षिकेचं नाव आहे. शिक्षिकेनं पेन फेकून मारल्यानंतर तो विद्यार्थ्याच्या डोळ्यावर लागला. यात त्याचा डाव्या डोळ्याची नजर गेली. याप्रकरणी पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिरुवनंतपुरूम येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती.
न्यायालयाने या प्रकरणी शिक्षिकेला एक वर्षाचा सश्रम कारावास तसेच तीन लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
घटना नेमकी काय? कधी घडली?










