खलिस्तानी चळवळीच्या पंजाबमधील समर्थकाला नांदेडमधून अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबमधील खलिस्तानी चळवळीच्या समर्थकाला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस आणि नांदेड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सरबजीतसिघ किरट असून त्याला सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. पंजाब सीआयडीनं याचं लोकेशन शोधून काढलं आणि याची माहिती नांदेड पोलिसांना दिली, त्या माहितीच्या आधारे नांदेड पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली. आता त्याची रवानगी पुन्हा पंजाबमध्ये करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

सरबजीतसिघ किरटबरोबर अन्य तीन जणांवर अमृतसरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार पैकी तिघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते, मात्र एक फरार होता. त्याला आता ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे वाचलं का?

यापूर्वी पंजाब पोलिसांनी उत्तर प्रदेशातची राजधानी लखनऊ मधूनही यूपी पोलिसांच्या मदतीने एका खलिस्तान समर्थकाला अटक केली होती. जगदेव सिंग ऊर्फ जग्गा असं त्याचं नाव असून तो पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जग्गा हा खलिस्तान समर्थक परमजीत सिंग पम्मा आणि मलतानी सिंग यांचा निकटवर्तीय मानला जातो. परमजीत सध्या युकेमध्ये आहे तर मलतानी हा जर्मनीत वास्तव्याला आहे. पंजाबमध्ये राष्ट्रविरोधी कारवाया केल्याचे आरोप दोघांवरही करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातल्या इतर अपडेट्ससाठी हे व्हिडिओ देखील पहा..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT