हसन मुश्रीफांमागे लागणार ईडीचा ससेमिरा?; किरीट सोमय्यांनी केला खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे माध्यमांना दाखवत हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मुश्रीफ यांच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. तशी यादी त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आणखी एका मंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

ठाकरे सरकारची टीम इलेव्हन जाहीर केली होती. यातील राखीव खेळाडूंची यादी वाढतच असून, त्यात आता आम्ही हसन मुश्रीफ यांचं नाव वाढवत असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

‘हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. इतकंच नाही, तर बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्याद्वारे मनी लाँड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे माझ्याकडे २७०० पानी पुरावे आहेत. हे पुरावे आयकर विभागाला दिले आहेत. सीआरएम सिस्टम प्रा. लि. प्रविण अग्रवाल म्हणून हिचा ऑपरेटर आहे. या कंपनीमधून हसन मुश्रीफांच्या मुलाने दोन कोटींचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे.

सीआरएम सिस्टीम ही शेल कंपनी आहे. तिच्यावर बंदी आलेली आहे. या कंपनीतील लोकांवर कारवाई सुरू आहे. नावीत मुश्रीफ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे दाखवलेलं आहे. त्यात त्यांनी २ कोटी ४५ लाख ३५४ रुपये रक्कम दाखवलेली आहे. सीआरएम सिस्टीमवर रिझर्व्ह बँकेपासून ते सगळ्यांकडून ती शेल कंपनी असल्याचं म्हटलेलं आहे’, असं सोमय्या म्हणाले.

ADVERTISEMENT

‘मरुभूमी फायनान्सकडून १५.९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सीकडून ३५.६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपीकडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएशट्सकडून ४.८९ कोटी, रजत कंझ्युमर्स सर्विसेसकडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटलकडून २.८९ कोटी मिळाले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

‘माझ्याकडे १२७ कोटी रुपयांचे पुरावे आहेत. यात हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या खात्यात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख ७८ हजार ३४० रुपयांचे समभाग दाखवले आहेत.

२०१८-१९मध्ये आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यातून अनेक माहिती समोर आली. ती माहिती दाबण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मुश्रीफ कुटुंबाने सरसेनापती संताजी धनाजी कारखान्यात १०० कोटीहून अधिक भ्रष्टाचार केला आहे, असंही सोमय्या म्हणाले.

‘आयकर विभागाकडे तक्रार दिली आहे. उद्या मुंबई ईडीकडे तक्रार करणार आणि पुरावे देणार आहे. परवा (१५ सप्टेंबर) दिल्लीतही कंपनी मंत्रालयाकडे, अर्थ मंत्रालयाकडे पुरावे सादर करणार आहे. ACB कडेही पुरावे दिले आहेत’, असं सोमय्या म्हणाले.

मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या या कंपन्यांचं कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येतं. २००३ ते २०१४ काळात मुश्रीफ मंत्री असताना या काळात शेल कंपन्याकडून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला कोट्यवधी रुपये मिळाले’, असा आरोप सोमय्या म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT