अमित शाह-फडणवीसांचं नाव वापरून सोमय्यांनी केली वसुली, साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला-राऊत

मुंबई तक

किरीट सोमय्यांनी मुंबईत साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला. किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार हे नक्की आहे. मी सगळे पुरावे गृहमंत्रालयाला दिले आहेत. देवेंद्र फडणवीस, ईडी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी खंडणी वसूल केली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना हे आरोप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

किरीट सोमय्यांनी मुंबईत साडेसात हजार कोटींचा घोटाळा केला. किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार हे नक्की आहे. मी सगळे पुरावे गृहमंत्रालयाला दिले आहेत. देवेंद्र फडणवीस, ईडी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे धमक्या देऊन किरीट सोमय्यांनी खंडणी वसूल केली आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना हे आरोप केले आहेत.

महाआयटी घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत त्यांना पळवून लावण्यात आलं आहे अशी माहिती मला मिळाली आहे. अमोल काळे कुठे आहे? २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. मनी लाँड्रींग झालं आहे. याचा जाब आम्ही केंद्र सरकारला विचारणार आहोत. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षा हा मोठा घोटाळा आहे. या मागे किरीट सोमय्या आहे. दलाल किरीट सोमय्या हे स्वतःच आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावर जोडा मारून घेणार आहेत. लोक त्याची धिंड काढणार आहेत लवकरच असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच-किरीट सोमय्या

पवई पेरूबाग येथील जमीन आहे ती पुनर्वसनाच्या नावाखाली जमीन स्वच्छ करण्यात आली. त्या ठिकाणी किरीट सोमय्यांचे एजंट आहेत. 433 लोक तिथे घुसवले गेले. प्रत्येकाकडून 25 लाख रूपये घेण्यात आले. त्या घोटाळ्याचे ट्रकभरून कागद माझ्याकडे आहेत असाही दावा संजय राऊत यांनी केला. किरीट सोमय्या आणि भाजपच्या लोकांनी एजंट लावले होते. या सगळ्यांकडून 300 कोटी पेक्षा जास्त रक्कम गोळा केली. यातले 50 कोटी रूपये फडणवीसांना द्यायचे आहेत असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं. फडणवीसांच्या नावावरही किरीट सोमय्याने वसुली केली आहे. मी इकॉनॉमिक अहवाल देणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp