सायरस मिस्त्रींची मुलं विद्यार्थी, पत्नी कॉर्पोरेट आयकॉन… जाणून घ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर रोजी कार अपघातात निधन झाले. दिवंगत भारतीय उद्योगपती शापूरजी पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा म्हणून सायरस यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी उंची गाठली होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सायरस मिस्त्रींच्या पाठीमागे दोन मुलं आणि पत्नी होती. मुलांसाठी हजारो कोटींची मालमत्ता पाठीमागे सोडून सायरल अनंतात विलीन झाले आहेत.

ADVERTISEMENT

पालोनजी ग्रुपचे अनेक व्यावसाय

शापूरजी पालोनजी ग्रुपचे व्यवसाय म्हणजे अभियांत्रिकी आणि बांधकामापासून रिअल इस्टेट, कापड, गृहोपयोगी वस्तू, शिपिंग, प्रकाशन, ऊर्जा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांपर्यंत पसरलेला आहे. या ग्रुपमध्ये सुमारे 25,000 कर्मचारी काम करतात. 1991 मध्ये, सायरस मिस्त्री भारतासह जगभरात पसरलेल्या या कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित होते. 1994 मध्ये त्यांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले. 2012 पर्यंत त्यांनी आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेला.

टाटा सन्समध्ये कुटुंबाचा 18.4 टक्के हिस्सा

2012 मध्ये टाटा सन्सची कमान त्यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर त्यांनी चार वर्षे ही जबाबदारी सांभाळली. टाटा समूहासोबत वादविवाद आणि कायदेशीर लढाई लढल्यानंतर त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं, नंतर कौटुंबिक व्यवसायाकडे वळले. 1865 साली स्थापन झालेल्या, 157 वर्ष जून्या शापूरजी पालोनजी मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच वेळी, समूहाचा व्यवसाय जगातील 50 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 2022 मध्ये एसपी ग्रुपची एकूण संपत्ती 30 अब्ज डॉलर आहे.

हे वाचलं का?

रतन टाटांशी कुटुंबाचे जवळचे संबंध

पालोनजी कुटुंब हे उद्योगक्षेत्रातील मोठं नाव आहे. सायरस मिस्त्री आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, कुटुंबात त्यांची आई पॅटसी पेरिन दुबाश, मोठा भाऊ शापूर मिस्त्री याशिवाय लैला मिस्त्री आणि अल्लू मिस्त्री या दोन बहिणी आहेत. मिस्त्री यांच्याशिवाय त्यांना पत्नी रोहिका छागला आणि दोन मुले फिरोज मिस्त्री आणि जहाँ मिस्त्री आहेत. सायरस यांच्या एका बहिणीचे लग्न रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झालेले आहे.

पत्नी आणि मुलांसाठी एवढी संपत्ती सोडून गेले सायरस मिस्त्री

कार आणि घोडेस्वारीचा शौक असलेल्या सायरस मिस्त्रींनी 1992 मध्ये रोहिका छागलासोबत लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहिका छागला स्वतः कॉर्पोरेट आयकॉन आहेत आणि काही खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये संचालक पदावर आहे. रोहिकांचे वडील इक्बाल छागला हे मोठे वकील होते आणि आजोबा एमसी छागला हे माजी कॅबिनेट मंत्री होते.

ADVERTISEMENT

लग्नानंतर ते फिरोज मिस्त्री आणि जहाँ मिस्त्री या दोन मुलांचे वडील झाले, जे शिक्षण घेत आहेत. अहवालानुसार, सायरस यांनी पत्नी आणि मुलांसाठी सुमारे 70,000 कोटी रुपयांची मालमत्ता पाठीमागे सोडली आहे. सायरस मिस्त्री यांनी 2012 पर्यंत कंपनीच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावली होती. परंतु डिसेंबर 2012 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर कौटुंबिक व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मोठा भाऊ शापूर मिस्त्री यांच्यावर आली.

ADVERTISEMENT

कुटुंबातील इतर सदस्यही सांभाळतात बिझनेस

रिपोर्टनुसार, 2019 मध्ये एसपी ग्रुपमध्ये अनेक फेरबदल झाले. कुटुंबातील नव्या पिढीवरही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. या अंतर्गत, समूहाचे प्रमुख असलेल्या शापूर मिस्त्री यांच्या 26 वर्षीय मुलाचा समूहाच्या होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. पेलोन कंपनीच्या शीर्ष पॅनेलवर आहे. तो धोरणात्मक आणि प्रभावी निर्णय घेतो. त्याच वेळी, त्यांची मुलगी तान्या हिला मिस्त्री ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची हाताळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पालोनजी ग्रुपनं बांधल्या ‘या’ भव्य इमारती

देशातील जुन्या आणि विश्वासार्ह बांधकाम कंपनीचा विचार केला तर शापूरजी पालोनजी मिस्त्री ग्रुपचे नाव अग्रस्थानी येते. शापूरजी पालोनजी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लिटलवुड पालोनजी बरोबर केली, ज्याची स्थापना त्यांचे वडील शापूरजी मिस्त्री यांनी केली होती. यानंतर पुढे जात एसपी ग्रुपने आपला व्यवसाय जगभर पसरवला. या ग्रुपने देशातच नव्हे तर परदेशातही मोठमोठ्या इमारती बांधल्या आहेत.

मुंबईतील ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेलही शापूरजी पालोनजी ग्रुपने बांधले आहेत. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जुन्या आणि नवीन इमारती, मुंबईतील लीलावती हॉस्पिटल, बँक ऑफ इंडिया आणि बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या इमारतीही या समूहाने बांधल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे बांधकाम असो किंवा पश्चिम आशियातील ओमानच्या सुलतानचा राजवाडा आणि आफ्रिकेतील घाना येथील राष्ट्रपती भवन असो, हे सर्व शापूरजी पालोनजी मिस्त्री गटाने बांधले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT